• Wed. Sep 9th, 2026

विक्रम काकडेंची विधान परिषदेवर एंट्री; बिनविरोध होताच आधी अजित पवारांना आदरांजली

विक्रम काकडेंची विधान परिषदेवर एंट्री; बिनविरोध होताच आधी अजित पवारांना आदरांजली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आणि अनेक निष्ठावंतांना डावलून विक्रम संजय काकडे यांनी विधान परिषदेची उमेदवारी मिळवली. एवढंच नाही तर दिवसभरातल्या नाट्यमय घडामोडींनंतर काकडेंची बिनविरोध निवड देखील झाली. विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर विक्रम काकडे यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानला भेट देत दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी माथा टेकला. विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर विक्रम काकडे यांनी ही भेट देत अजित पवारांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी काकडे काहीसे भावुक झालेले दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed