• Fri. Jun 5th, 2026
    Jalna Crime : तुकाराम मुंढेंची ‘सर्जिकल स्ट्राईक’! प्रशासनाची धडक कारवाई, तब्बल 13 लाखांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त; नागरिकांच्या जीवाशी खेळ

    Jalna Adulterated Ghee Worth 13 Lakh Seized : तुकाराम मुंढेंनी जेव्हापासून अन्न-औषध प्रशासनाचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून राज्यात अन्न किंवा औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेलच दणाणले आहेत.

    जालना तीर्थपुरी भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे अन्न व औषध प्रशासनानं (FDA) भेसळयुक्त तूप निर्मिती करणाऱ्या आस्थापनावर मोठी धडक कारवाई करत तब्बल 13 लाख 4 हजार 539 रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अन्न भेसळीच्या प्रकारांवर मोठा प्रकाश पडला असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

    तुकाराम मुंढेंचे आदेश अन्…

    अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार 3 जून रोजी जालन्याच्या तीर्थपुरी येथील मे. मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांना धक्कादायक बाबी आढळून आल्या. खाद्यतेल आणि विविध प्रकारचे एसेन्स वापरून तुपासारखा दिसणारा पदार्थ तयार करून त्याची विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झालं. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी आस्थापनातील एकूण 1903 लिटर साठा जप्त केला. या साठ्याची किंमत 13 लाख रुपयांहून अधिक असल्याचं सांगण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये 1121 लिटर पॅकबंद तूप, ८663 लिटर खुले तूप तसेच 118 लिटर रिफाइंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त तूप निर्मितीसाठी वापरण्यात येणारे एसेन्स देखील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं.
    Maharashtra TimesAhilyanagar MLC Election : ‘मी माघार घेतलीच नाही, अन्याय झाल्यास…’; अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरेंचा गंभीर आरोप, अहिल्यानगरमध्येही हायव्होल्टेज ड्रामा

    संबंधित आस्थापनं पूर्णपणे सील

    अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून विविध ब्रँडच्या तुपाचे नमुने, खुल्या स्वरूपातील तूप, रिफाइंड सोयाबीन तेल आणि एसेन्स असे एकूण आठ नमुने संकलित केले आहेत. हे सर्व नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कारवाईनंतर संबंधित आस्थापनं पूर्णपणे सील करण्यात आले असून पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारचं उत्पादन अथवा व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Maharashtra TimesPune News : पुण्याचे 82 वर्षीय आजोबा स्कूटीवर निघाले, वाटेत विस्मरण, लेकीची पोलिसांकडे धाव, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळ्यात काय घडलं?

    पुढील काळातही अशाच धडक तपासणी मोहिमा

    ही कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जालना येथील सहाय्यक आयुक्त नि. सु. कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे, अनुजा नगरारे तसेच नमुना सहाय्यक धम्मदीप नरवडे यांच्या पथकाने ही यशस्वी मोहीम राबविली. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून तूप किंवा इतर अन्नपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, पॅकिंग व अधिकृत माहिती तपासूनच खरेदी करावी, असं सांगितलं आहे. जिल्ह्यात अन्न भेसळ रोखण्यासाठी पुढील काळातही अशाच धडक तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असून भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा