सोलापूरच्या राजकारणात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने प्रचंड प्रयत्न केले. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांनी शेवटपर्यंत मोबाईल स्विच ऑफ ठेवला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. भाजपकडून राजेन्द्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या राजकीय हालचाली सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता. भाजप बिनविरोध करण्याच्या तयारीत असताना, वसंत नानांनी निवडणूक लावली. वसंत नाना देशमुखांचा अर्ज मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न अपयशी ठरले. अखेर सोलापुरात विधान परिषद निवडणूक लागली आहे.
‘झारीतला शुक्राचार्य कोण?’
शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्यांनी माघारी घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. भाजपने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून वसंतराव उर्फ नाना देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. याबाबत भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी निवडणूक कार्यालयाबाहेर येऊन अधिकृतरित्या माहिती दिली.
“सोलापूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. मात्र एका नेत्याच्या इगोमुळे सोलापुरात निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक किती आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, झारीतला शुक्राचार्य कोण आहे, हे निवडणुकीनंतर दाखवून देऊ”, असा इशारा भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी यापूर्वी विधान परिषद निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करतात. सोलापुरात एकूण 616 मतदार आहेत. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यात भाजपचे 304 लोकप्रतिनिधी आहेत. विजयासाठी भाजपला 309 मतांची गरज आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्यात 32 नगरसेवक आहेत.
शेवटच्या अर्ध्या तासात तीन जणांनी माघार घेतली
विधान परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या बैठका झाल्या आहेत. शेवटच्या अर्ध्या तासात, महेश (नाना) साठे (शिवसेना नेता अर्ज अपक्ष), रमेश बारसकर (शिवसेना नेता अपक्ष अर्ज), नागेश अक्कलकोटे(अपक्ष), धनंजय डिकोळे (शिवसेना उबाठा, अर्ज अपक्ष) , जीवन जानकर (अपक्ष), नागेश अक्कल कोटे (अपक्ष) यांनी माघार घेतली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा