म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. या योजनेचा आढावा घेणे आणि आवश्यकतेनुसार निकषांमध्ये बदल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयानंतर सहकार विभागाने लगेच शासन निर्णय जारी केला.
योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शक आणि जलद पद्धतीने पोहोचावा, यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा, मंत्रिमंडळ उपसमिती आणि तांत्रिक व्यवस्था उभारण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार निकषांमध्ये बदल करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री, महसूल, कृषी आणि सहकार मंत्री यांचा समावेश असून सहकार विभागाचे प्रधान सचिव समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना सहकार विभागामार्फत जारी करण्यात येतील. लाभार्थी पडताळणी, आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी; तसेच निधी वितरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर योजनेची अंमलबजावणी करताना योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार, वित्त, सहकार, कृषी, माहिती तंत्रज्ञान विभागांचे वरिष्ठ अधिकारी; तसेच सहकार आयुक्तांचा समावेश असेल.
दरम्यान, ‘महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना म्हणजे केवळ धूळ फेक आहे,’ अशी कठोर टीका काँग्रेसने बुधवारी केली. या योजनेत जाणीवपूर्वक इतक्या अटी-शर्ती आहेत, की ५० टक्क्यांहून अधिक शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असे काँग्रेसचे प्रदशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. ‘ही योजना केवळ १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील पीककर्ज व पुनर्गठित कर्जापुरतीच मर्यदित आहे. त्यामुळे विहीर, पाइपलाइन किंवा जनावरांसाठी कर्ज घेतलेले शेतकरी या योजनेतून पूर्णपणे बाहेर राहतात; तसेच महाविकास आघाडीच्या महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचा आधीच लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या वेळी केवळ ५० हजार रुपयांचाच फायदा मिळणार आहे,’ असे ते म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा