• Fri. Jun 5th, 2026
    विक्रम संजय काकडेंची मालमत्ता 150 करोड, दुबईत आलिशान फ्लॅट, जय पवारांना 10 कोटींचं कर्ज दिल्याचं उघड

    Vidhan Parishad Election : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम संजय काकडे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जय पवार यांना कर्ज दिल्याचा उल्लेख आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ऐन वेळी प्रवेश करून तिकीट मिळविलेल्या आणि त्यावरून नाराजीनाट्य सुरू झालेल्या विक्रम संजय काकडे यांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे विविध व्यक्तींसह कंपन्यांना विक्रम यांनी कर्ज म्हणून रक्कम दिली असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि ‘राष्ट्रवादी’चे नेते जय पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे उघड झाले आहे.

    जय पवारांना १० कोटींचे कर्ज

    पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून काकडे निवडणूक लढवित आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जय पवारांना १० कोटींच्या कर्जाशिवाय परवेज ग्रँट यांना दोन कोटी १७ लाख रुपये; तसेच रुस्तुम भरोचा, श्रीशा एंटरप्रायझेस, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स, राज डेव्हलपर्स यांसारख्या व्यक्ती आणि कंपन्यांना सुमारे ४० कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज दिल्याची बाब उघड झाली आहे.
    Maharashtra TimesSolapur News : माझी सहीच नाहीये, काँग्रेसच्या सूचकानेच विधान परिषद उमेदवाराचा गेम केला, सोलापुरात नाट्यमय ट्विस्ट

    दीडशे कोटींची मालमत्ता

    एकूण दीडशे कोटी रुपयांच्या मालमत्तेमध्ये विविध बँकांसह शेअर, विमा, पोस्टामध्ये गुंतवणूक, ४१० ग्रॅम सोने, पाच किलोहून अधिक चांदी, आलिशान घड्याळे, मोटार कार, आलिशान बोटी यांसारख्या साधनांचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रात १५ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. काकडे यांच्याकडे साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम आहे. विविध बँकांमध्ये २९ लाख ५३ हजार ६२९ रुपयांची रक्कम त्यांच्या नावे आहे. विक्रम यांच्यावर ४१ कोटी ८० लाख २७ हजार ७६१ रुपयांचे कर्ज आहे. ५० लाख रुपये किमतीची परवाना असलेली हत्यारे त्यांच्याकडे आहेत. अशी एकूण ७८ कोटी ९५ लाख ६५ हजार ५३१ रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे.

    फसवी कर्जमाफी, महागाईविरोधात रस्त्यावर उतरणार; रोहित पवारांचा महायुती सरकारला इशारा

    दुबईमध्येही सदनिका

    मावळ तालुक्यात दोन ठिकाणी आणि मुंढवा येथे जमिनी, पाषाण येथे ४५४४ चौरस फूट क्षेत्रफळ इतकी सदनिका; तसेच त्याच इमारतीत तेवढ्याच आकाराची सदनिका पत्नी देविका यांना विक्रम यांनी गिफ्ट केली आहे. दुबईमध्ये आलिशान सदनिका आहे. एकूण ७४ कोटी सात लाख रुपयांची मालमत्ता विक्रम काकडे यांच्याकडे, तर पत्नी देविका यांच्या नावावर नऊ कोटी १९ लाख रुपयांची मालमत्ता आहे. आठ कोटी ३९ लाख रुपयांचा प्राप्तिकर त्यांच्याकडे थकीत आहे.
    Maharashtra TimesDelhi Fire : वृद्धाच्या उपचारासाठी आलेलं कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी; आजी, मुलगा, सून, नातींसह 8 जणांचा मृत्यू, आजोबांना कल्पनाच नाही

    श्रीकांत पाटील यांची संपत्ती

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्याकडे दोन लाख रुपये, तर पत्नीकडे ४० हजार आणि आईकडे २५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. पाटील यांच्याकडे दोन तोळे, तर त्यांच्या पत्नीकडे ५० तोळे सोने आणि आईकडे पाच किलो चांदी आहे. पाटील यांच्याकडे कुटुंबाची मिळून एकूण एक कोटी आठ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. आई आणि कुटुंबाच्या नावावर तळेगाव दाभाडे येथे १७ एकर जमीन आहे. बोपोडी येथे बिगर शेतजमीन आहे. निवासी इमारती आहेत. जमिनी आणि घरे ही वडिलोपार्जित आहेत. त्याची एकूण किंमत ३७ कोटी १० लाख रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा