IAF Personnel Drowns In Khadakwasla Canal: पुण्यातील खडकवासला कालव्यात बुडून ४१ वर्षीय भारतीय हवाई दलातील एका सार्जंटचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
राजेशकुमार वर्मा (वय ३५) असे मृत सार्जंटचे नाव आहे. वर्मा यांची नियुक्ती राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथील एअर फोर्स विभागात होती. रविवारी ते ‘एनडीए’मधील काही सहकाऱ्यांसोबत खडकवासला येथील यशवंतराव महाविद्यालयाजवळील कालव्यात पोहण्यासाठी गेले होते.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात दोघांचा करुण अंत; खंडाळा घाटातील घटना, तिघे गंभीर जखमी
पोहत असताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने वर्मा पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच ‘पीएमआरडीए’ अग्निशामक दल, मुळशी व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी; तसेच ‘एनडीए’चे जवान घटनास्थळी दाखल झाले. विविध पथकांनी कालवा परिसरात व्यापक शोधमोहीम राबविली. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास नांदेड फाटा परिसरात वर्मा यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Pune ST Bus: स्पीड ब्रेकरवर बस आदळल्याने 23 वर्षीय तरुणीचा मणका फ्रॅक्चर; संवेदनाही हरपली, बसचालकावर गुन्हा
शोधमोहिमेदरम्यान महिलेचे प्राण वाचविले
सार्जंट राजेश वर्मा यांचा शोध सुरू असताना अग्निशमन दलाच्या जवानांना कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात एक महिला वाहून जाताना दिसली. प्रसंगावधान राखून ‘पीएमआरडीए’ अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला तत्काळ पाण्याबाहेर काढले. त्यानंतर संबंधित महिलेला ‘एनडीए’च्या एअर फोर्स कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय पथकाने तिला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
रविवारी इंद्रायणी नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाला. पहिली घटना देहूगाव येथील गाथा मंदिराजवळ घडली, तर दुसरी घटना कुंडमळा येथे घडली. दोघांची ओळख पटलेली नाही. नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
