• Fri. Jun 5th, 2026

    Pimpleshwar Temple: 20 वर्षांच्या प्रयत्नांना यश! डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिरभूमीचा तिढा सुटला; ट्रस्टसाठी 4 एकर जमीन मंजूर

    Pimpleshwar Temple: 20 वर्षांच्या प्रयत्नांना यश! डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिरभूमीचा तिढा सुटला; ट्रस्टसाठी 4 एकर जमीन मंजूर

    Dombivali Pimpleshwar Temple: या निर्णयामुळे 8 जून रोजी भव्य शिवोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभात भजन, किर्तानाचे कार्यक्रम असतील आणि मुख्यमंत्रीही उपस्थित असतील.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    डोंबिवली: ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक पिंपळेश्वर महादेव मंदिराचा अनेक वर्षांचा वाद मिटला आहे. डोंबिवलीमधील या मंदिराच्या जमिनीचा 20 वर्षांपासूनचा तिढा सुटला आहे. राज्य सरकारने मंदिरासाठी 4 एकर आणि 25 गुंठे जागा मंजूर केली आहे. यानिमित्ताने मंदिरात भव्य उत्सव साजरा केला जाणार आहे. 8 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहतील.

    भव्य शिवोत्सवाचं आयोजन

    सरकारच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये आनंद साजरा केला जात आहे. या घोषणेनंतर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीसह मंदिरात पोहोचून संकल्पपूर्ती पूजन केलं. मंदिरभूमीच्या जागेचा हक्क दिल्याच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यावेळी आभार मानले. यावेळी त्यांनी 8 जून रोजी साजरा होणाऱ्या भव्य शिवोत्सवाची माहिती दिली. या उत्सवात भजन-किर्तन कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. आणि उपमुख्यमंत्र्‍यांसह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित असतील.

    गेल्या दोन दशकांपासून या मंदरभूमीच्या हक्काचा प्रश्न कायम होता. ग्राम सभा, आंदोलनं, आणि अथक प्रयत्नांनतर अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली येथील 4.3 एकर औद्योगिक जमीन पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टला नाममात्र दरात हस्तांतरित करण्यास राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीत काही दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली. त्यानंतर रविंद्र चव्हाणांनी मंदिरा भेट देऊन भव्य सोहळ्याबद्दल माहिती दिली.

    काय होतं प्रकरण?

    डोंबिवली येथे कल्याण-शिळ मार्गावर श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराला 1997मध्येच महाराष्ट्र सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला होता. डोंबिवली ओद्योगिक क्षेत्रातील सागाव-सोनारपाडा भागातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) मालकिची असलेल्या जागेचा वापर अनेक वर्ष ट्रस्टद्वारे केला जात होता. आता ही जागा अतिक्रमणमुक्त करून ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

    मंत्रिमंडळाने केडीएमसीला योग्या ती कारवाई करत अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्याचे निर्देश दिले आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंनी सतत यासाठी पाठपुरावा केला होता. या परिसरात गौशाळा, वैदिक शाळा, सामाजिक सभागृह आणि 400हून अधिक झाडांचा समावेश आहे. या मंदिर परिसराचा विकास, सुशोभीकरण केले जाणार आहे. यामुळे शिवभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा