नाशिक: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघात निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे. या जागांसाठी १८ जूनला मतदान होणार असून, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत असल्याने सर्वपक्षीय इच्छुकांच्या गोटात वेगवान हालचाली सुरू होत्या. विधानपरिषदेच्या नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी थेट बंडाची भूमिका घेतली. “पक्षनेतृत्वाच्या संमतीने मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे,” असं गोरख बोडके यांनी जाहीर करून टाकलं. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळू शकला नाही.
आपल्या उमेदवारीबद्दल माहिती देताना गोरख बोडके यांनी म्हटलं की, “महायुतीमधील भाजप आणि शिवसेना हे मित्र पक्ष विश्वासात घेत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज उमेदवारी अर्ज भरला आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संमतीने अर्ज भरला. एबी फॉर्म दुपारी तीन पूर्वी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. जिल्ह्यात आमचे सहा आमदार आणि 106 सदस्य आहेत. पक्ष देईल तो आदेश मान्य राहील,” असं गोरख बोडके यांनी सांगितलं होतं.
दराडे महायुतीचे उमेदवार
महायुतीची नाशिकची जागा कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत उत्सुकता होती. ही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सुटली असून, माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षातील कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने मविआकडून या निवडणुकीत अपक्षाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा ठोकला होता. महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष भाजपचे गणेश गिते यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करून दबावाचे राजकारण सुरू केले, परंतु अखेर जागावाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाकडेच गेली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा