Suman Kalyanpur Death : प्रिय मैत्रिणीच्या निधनाने अतीव दुःख, सुमन कल्याणपूर यांचा अलविदा, उषा मंगेशकर यांना शोक अनावर
‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर’ म्हणत संसाराचे तत्त्वज्ञान उलगडणारा आवाज, ‘असावे घर ते अपुले छान’ म्हणत रम्य घराची स्वप्ने रंगवणारा स्वर, ‘उठा उठा चिऊताई’ सारख्या बालगीतांना गोडवा देणारी गायिका आणि ‘उत्तुंग आमुची उत्तर सीमा’ म्हणत वीररस जागवणारा कंठ, या सर्व गीतांना अमरत्व देणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वार्धक्याने अंधेरी पश्चिम येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. आज, सोमवारी सकाळी अंधेरी-जुहू येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
