‘एन्सो’ तनोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान एल निनोची तीव्रता अधिक; अभ्यासकांचा इशाराटस्थ स्थितीतून एल निनो सक्रिय होण्याकडचा हा प्रवास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत घातक मानला जातो. या स्थितीचा थेट परिणाम भारतीय उन्हाळ्यावर आधीच झाला असून, आगामी काळात ही समस्या अधिक गंभीर होणार आहे, असे मत हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत. राष्ट्रीय सागरीय आणि वातावरणीय प्रशासनाच्या सल्ल्यानुसार एल निनो मे ते जुलैदरम्यान सक्रिय होण्याची शक्यता ८२ टक्के होती. त्यानंतर हिवाळ्यामध्येही ही स्थिती कायम राहू शकते, असे सांगण्यात आले होते. ही शक्यता ९६ टक्के होती. ‘क्लायमेट ट्रेंड्स’ने यासंदर्भात विश्लेषण जारी केले आहे.
Bhiwandi FDA Raid: भिवंडीत 6 हजार किलो मिथेनॉल जप्त; FDAची धडक कारवाई, पुणे प्रकरणात विषारी रसायन पुरविल्याचे उघड
यंदा सुपर एल निनोची शक्यता असल्याने २०२४ या विक्रमी उष्ण वर्षापेक्षा अधिक तापमान नोंदले जाण्याची शक्यताही मॉडेलनुसार वर्तवण्यात आली आहे. २०२६ मधील उष्णता २०२४ च्या विक्रमी तापमानापर्यंत पोहोचू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच २०२७ मध्ये २०२४ पेक्षा अधिक तापमान नोंदवले जाईल, अशीही मोठी शक्यता आहे. अनेकदा एल निनो ज्या वर्षी सक्रिय होते, त्यानंतरच्या वर्षी अधिक तापमान नोंदले जाते, असेही दिसले आहे. सन २०२३ मध्ये एल निनो प्रणाली सक्रिय झाली होती, त्यानंतर २०२४ हे विक्रमी उष्ण वर्ष ठरले.
दमट उष्णतेच्या लाटा
मेरीलँड विद्यापीठाचे मानद प्राध्यापक आणि आयआयटी कानपूरचे अभ्यागत प्राध्यापक रघु मुर्तुगुड्डे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा एल निनोचा मान्सूनवर मोठा प्रभाव पडेल. यंदा पावसाचे वितरण विखुरलेले असेल आणि मान्सूनमध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. मान्सून वेळेवर संपूर्ण भारतभर न पोहोचल्यास, येत्या काही महिन्यांत वायव्य भारताच्या काही भागांमध्ये दमट उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. पाकिस्तानात उष्णतेच्या लाटा जुलै महिन्यात शिगेला पोहोचतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
Mumbai Crime: भरलेल्या सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅसचोरी! खारमधील प्रकार; डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल
चार दशकांनंतर ‘सुपर एल निनो’चा धोका’
‘स्कायमेट वेदर’ या खासगी हवामान संस्थेचे हवामानशास्त्रज्ञ आणि हवामान बदल विभागाचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रशांत महासागरात विकसित होत असलेली ‘एल निनो’ची परिस्थिती चार दशकांपूर्वीच्या ‘सुपर-एल निनो’च्या बरोबरीची असू शकते. जागतिक तापमानवाढीमुळे मानवनिर्मित अतिरिक्त उष्णतेपैकी ९० टक्के उष्णता महासागर शोषून घेतात. आता पॅसिफिक महासागराचे तापमान विक्रमी उच्चांकाकडे सरकत असल्याने, याचे अत्यंत गंभीर परिणाम हवामानावर दिसू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
सुपर एल निनोच्या घटना
-१९८२-८३, १९९१-९२, १९९७-९८ आणि २०१५-१६
-यात १९८२-८३ मध्ये तापमान २.५ अंशांनी वाढलेले होते.
-एल निनो काळातील कमी पावसामुळे जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते.
-उष्णता वाढून पाण्यावरील ताणही या काळात वाढू शकतो
