• Sun. Jun 7th, 2026

    एकाच ठिकाणी मेट्रो आणि मोनोरेल स्थानक, चेंबूरमधून प्रवास सोपा होणार; ‘इंटरचेंज’मुळे फायदा

    एकाच ठिकाणी मेट्रो आणि मोनोरेल स्थानक, चेंबूरमधून प्रवास सोपा होणार; ‘इंटरचेंज’मुळे फायदा

    मुंबई: चेंबूरमधील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. लवकरच त्यांना मेट्रो, मोनोरेल आणि रेल्वे असे प्रवासाचे तीन पर्याय उपलब्ध होणार आहे. पूर्व मुंबईतील प्रवासासाठी चेंबूर एक महत्त्वपूर्ण दुवा बनणार आहे. ‘मेट्रो लाइन 2बी’वरील चेंबूर स्थानकाचं काम पूर्ण झालं आहे. मोनोरेल आणि रेल्वे स्थानक या मेट्रो स्थानकाच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे या मार्गावर एक इंटरचेंज निर्माण झालं आहे. प्रवाशांना यामुळे मोठा फायदा होणार आहे.

    मेट्रो आणि मोनोरेल स्थानकांची पाहणी

    MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जींनी चेंबूर मेट्रो स्थानकाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासह MMMOCLचे संचालक कान्हुराज बगाटेही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी व्ही.एन. पुरव मोनोरेल स्थानकाचीही पाहणी केली. या दोन्ही स्थानकांदरम्यान इंटरचेंज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी मोनोरेल आणि मेट्रो या दोन्ही मार्गांवरून सहजपणे प्रवास करू शकतील. यामुळे पूर्व उपनगरांना मुंबईतील दक्षिण आणि मध्य उपनगरांशी जोडण्यात येणार आहे.

    Mumbai News: गोरेगावमध्ये कोंडीमुक्त प्रवास, ‘मृणालताई गोरे उड्डाणपुला’चा विस्तार पूर्ण होण्याच्या मार्गावर; जूनमध्ये वाहतूक सुरू

    ‘मेट्रो लाइन 2बी’ मार्गावरील चेंबूर स्थानकांच काम पूर्ण झालं आहे. आता केवळ CMRSकडून चाचणी होणं बाकी आहे. हे पूर्ण होताच स्थानक प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे. सध्या ‘मेट्रो लाइन 2बी’ मार्गावरील फेज 1 वर प्रवास सुरू आहे. डायमंड गार्डनर ते मंडाले जोडणारा हा मार्ग 5.4 किलोमीटर लांब आहे. या मार्गावर एकूण 5 स्थानकं कार्यरत आहेत. यामध्ये डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मान्खुर्द आणि मंडाले या स्थानकांचा समावेश आहे.

    ‘मेट्रो लाइन 2बी’ ला अल्प प्रतिसाद

    एप्रिल महिन्यात मेट्रो लाइन 9 आणि ‘मेट्रो लाइन 2बी’चं लोकार्पण झालं. दहिसर ते मिरा भाईंदर जोडणाऱ्या मेट्रो लाइन 9ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक लोकल प्रवासी मेट्रोकडे वळले आहेत. या दोन महिन्यांमध्ये भाईंदर आणि मिरा रोड रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची संख्याही काही टक्क्यांनी कमी झाली आहे. पण हा प्रतिसाद मेट्रो 2बी वर दिसून नाही आली. अपेक्षेच्या तुलनेत फार कमी प्रवासी संख्या नोंदली गेली असून या मार्गावरील स्थानकं ओस पडत आहेत.

    Maharashtra TimesKonkan Railway: कोकण रेल्वेवर परतीचा प्रवास रखडला; मडगाव, तेजस, कोकणकन्या एक्सप्रेसवर परिणाम, 4-5 तास विलंब

    ‘मेट्रो लाइन 2बी’ (यलो लाइन)च्या फेज 2मध्ये डायमंड गार्डन ते डी.एन.नगर 18 किमी लांब मार्ग खुला होणार आहे. या टप्प्यामध्ये चेंबूर, पश्चिम द्रुतगती महामार्ग (EEH), कुर्ला पूर्व, एस.जी. बर्वे मार्ग, MTNL, IL&FS, ITO, वांद्रे मेट्रो, नॅश्नल कॉलेज, सारस्वत नगर, खिरा नगर, नानावटी रुग्णालय, प्रेम नगर, ESICनगर या 15 स्थानकांचा समावेश आहे. पण फेज 1ला मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे चेंबूर मेट्रो स्थान फेज 2 सुरू होण्यापूर्वीच खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रवासी संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed