• Sat. Jun 6th, 2026
    MLC Election : विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या सेनेकडून प्रसिद्ध डॉक्टरांचं नाव जाहीर, पक्षाच्या बड्या नेत्याची ट्विटद्वारे घोषणा; नेमकं कोण?

    Parbhani Hingoli Legislative Council Election : सध्या राज्यभरात आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे.

    परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक डॉक्टर विवेक नावंदर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धनाजी चव्हाणी, परभणी : परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणी शहर महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया संपन्न होत आहे. त्यापैकी सहा जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळाल्या आहेत. महायुतीमध्ये परभणी- हिंगोली विधान परिषदेच्या जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटण्याची दाट शक्यता असल्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यामध्ये रंगणार आहे.

    विवेक नावंदर कट्टर शिवसैनिक

    शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले डॉक्टर विवेक नावंदर हे कट्टर शिवसैनिक आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेले डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं या मतदारसंघात चांगली चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीने डॉक्टर नावंदर यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये देखील चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टर विवेक नावंदर हे परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ असून त्यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे. परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे ते खंदे समर्थक म्हणून देखील ओळखले जातात.

    Maharashtra TimesDhananjay Deshmukh: धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

    शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार

    महाविकास आघाडी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला परभणी-हिंगोली विधान परिषदेत जागा सुटली असतानाच महायुतीमध्ये देखील ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून देखील मातब्बर नेता या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिध्द केलेले माजी आमदार विप्लोबाजेरिया त्याचबरोबर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे पुत्र तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे काही नेते देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं नाही. आतापर्यंत तरी परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे हे सिद्ध केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील खरी शिवसेना कोणाची याचा देखील निकाल लागणार आहे.
    Maharashtra TimesSolapur News : क्रिकेटर होण्याचं स्वप्न अधूरं; पीचवरील सिमेंटचा रोलर ओढण्याचे आदेश, त्याचवेळी आक्रित घडलं; 15 वर्षीय आरवचा अंत

    उद्या शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार

    अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर विवेक नावंदर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘उद्या महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत मिळून परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास हा सार्थ ठरवणार असल्याचं देखील डॉक्टर विवेक नावंदर म्हणाले आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा