Maharashtra Live News: महामुंबईत रविवारी सकाळीच पावसाने दमदार हजेरी लावली असून मान्सूनपूर्व सरींमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भातही तापामान घट झाली असून येत्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमध्ये चार दिवसांत मान्सूनआगमन होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, शनिवारी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी रात्री उपोषण मागे घेतले. अनेक प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती देत त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी सरकारने 58 लाख कुणबी नोंदी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
