• Sat. Jun 6th, 2026

    Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी दारूचे मृत्यूतांडव कायम; आणखी तिघांचा मृत्यू, तब्बल ५२ आरोपींना अटक

    Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी दारूचे मृत्यूतांडव कायम; आणखी तिघांचा मृत्यू, तब्बल ५२ आरोपींना अटक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचे मृत्यूतांडव सुरूच आहे. फुगेवाडीतील दोघांचा; तर ससाणेनगरातील एका नागरिकाचा विषारी दारू प्यायल्याने शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे विषारी मद्यबळींची संख्या २२ वर पोहोचली आहे. ‘सीआयडी’ने या प्रकरणी दोन तपास पथके नियुक्त केली आहेत. दरम्यान, या दारू प्रकरणात मिथेनॉल पुरविणाऱ्या कंपनीवर ‘एफडीए’ने छापे घातले आहेत.

    राजेंद्र टप्पो (वय ३६, रा. फुगेवाडी) आणि महेंद्र ओव्हाळ (वय ५८, रा. दापोडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय ससाणेनगर येथील सॅम्युल लिंकन धैर्यम (वय ४९, रा. ससाणेनगर, हडपसर) याचा मृत्यू झाला. तिघांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे फुगेवाडीतील मृतांची संख्या पंधरावर; तर हडपसरमधील मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे. याशिवाय दोन्ही परिसरातील आठहून अधिक नागरिकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

    खडबडून जागे झालेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. मिथेनॉल-मिश्रित विषारी दारूचे वितरण करणारा मुख्य सूत्रधार योगेश व्हानकडे उर्फ सिकंदर राठोड, त्याला पुरवठा करणारा आरोपी राधेश्याम उर्फ राजू प्रजापती यांच्यासह कर्नेलसिंग तखतसिंग विरका (वय ७३), गुरमंतसिंग कर्नेलसिंग विरका (वय ४५), इंदरजित कौर कर्नेलसिंग विरका (वय ६०), कल्पेश अशोक अग्रवाल (वय २९, रा. खडकी) यांच्यासह नऊ जणांची पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे.

    जिल्ह्यात कारवाई तीव्र; ५५ गुन्हे दाखल

    पुणे जिल्ह्यात मिथेनॉल मिश्रित हातभट्टी दारूमुळे मृत्यू होण्याच्या घटनांनी उत्पादन शुल्क विभाग अखेर खडबडून जागा झाला आहे. तेरा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच अवैध हातभट्टी विक्री आणि निर्मितीला रोखण्यासाठी गुरुवारपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात लोणीकाळभोर, वाल्हेसह अनेक ठिकाणी कारवाई करून ५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ५२ आरोपींना अटक करून सुमारे चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed