Nashik Santh Nivruttinath Maharaj Chariot Sarja-Bhaskar : आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपूरला भक्तांची वारी जाते. नाशिकमधल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ ओढण्याचा बहुमान ‘सर्जा-भास्कर’या बैलजोडीला मिळाला आहे.
बैलजोड्या आलटून-पालटून रथ ओढतात
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, रथ व नगारा गाडी ओढण्यासाठी सक्षम बैलजोडीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर तसेच पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा ५० दिवसांचा पालखी सोहळा असतो. या बैलजोड्या आलटून-पालटून रथ ओढतात. दरम्यान, पावसाळ्यात दररोज १० ते १५ किमी प्रवास करावा लागत असल्याने सक्षम आणि प्रशिक्षित बैलजोडीची निवड केली जाते.
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेणार, पण कोर्टाच्या आदेशांचेही पालन करावे लागणार; जरांगेंच्या उपोषणावर बोलताना मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले?
‘चित्या’ आणि ‘धिंगाण्या’लाही मान
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ ओढण्याचा मान प्रथमच सिन्नर तालुक्याला मिळाला आहे. सुरेगाव येथील शेतकरी संपत भालेराव यांच्या ‘चित्या’ आणि ‘धिंगाण्या’ या बैलजोडीची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे भालेराव कुटुंबाचा अनेक वर्षांचा प्रयत्न अखेर यशस्वी ठरला आहे. निवड झाल्यानंतर संपत भालेराव आणि त्यांचे बंधू राजाराम भालेराव यांनी पौष्टिक खुराक देत बैलांची विशेष काळजी घेतली जात आहे.
माउलींच्या पालखीचे वेळापत्रक जाहीर
आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी येत्या आठ जुलैला पंढरपूरला प्रस्थान ठेवणार असून, नऊ आणि दहा जुलैला पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील मुक्कामाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आळंदी संस्थानने जाहीर केले असून, यंदा पालखीचे आठ जुलैला प्रस्थान आणि २४ जुलैला पालखी पंढरपूरला पोहचणार असल्याचे स्पष्ट केले. आळंदी ते पंढरपूर प्रवासात १७ मुक्काम, चार गोल रिंगण आणि तीन उभी रिंगणे होणार आहेत.
लोणावळ्यात 450 फूट खोल दरीत पडून नौदल कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; व्हिडिओ कॉलवर बोलणं महागात, काय घडलं?
पालखीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात आठ जुलै आळंदी येथून प्रस्थान, नऊ व १० जुलै पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्कामी, १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे. १५ जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी १६ जुलैला लोणंद येथे मुक्कामी असेल. लोणंद येथून पुढे दुपारी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी असणार आहे. १७ जुलैला फलटण, १८ जुलै रोजी बरड येथे पालखी मुक्कामी असेल.
Pune Crime : संवेदना, सतर्कता अन् संताप; पुण्यातील प्रकरणाचे भयाण वास्तव, पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार असल्याचा आरोप
नातेपुते येथे पालखी १९ जुलैला मुक्कामी राहणार आहे. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. २१ जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी मुक्कामी असेल. ठाकुरबुवा समाधीजवळ २२ जुलैला तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भेंडीशेगावला मुक्कामी राहणार आहे.
