Bullet Train in Nashik: नाशिकमधील रहिवाशांनाही बुलेट ट्रेनशी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. जपानच्या सहकार्याने हायस्पीड रेल्वे प्रकल्पाशी जोडणी तयार केली जाणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग बारगळल्यानंतर आता जपानच्या पुढाकाराने बुलेट ट्रेनला चालना मिळणार आहे. जपानच्या सरकारच्या सहकार्याने सुरू असलेल्या अहमदाबाद-मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाशी आता नाशिकही कनेक्ट होणार आहे. या प्रकल्पाच्या मुख्य मार्गाला नाशिक फिडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात येणार असून, या हायस्पीड कॉरिडोरमुळे ‘ठाणे-पुणे-नाशिक’ असा नवा आर्थिक सुवर्णत्रिकोण आकारास येणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिककरांना मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही शहरे अवघ्या दीड-दोन तासांत गाठणे शक्य होणार आहे.
जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) आणि ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान’ (एएफजे) यांच्या पुढाकाराने नाशिकला ‘हायस्पीड रेल्वे’ नेटवर्कशी जोडण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी (दि. २९) महापालिका आयुक्तांसोबत उच्चस्तरीय जपानी सल्लागार टीमची महत्त्वाची बैठक झाली. प्रभारी आयुक्त अमित रंजन यांच्यासोबत जपानी शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेत नाशिकला अहमदाबाद-मुंबई-हैद्राबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाशी जोडणाऱ्या प्रस्तावाचे सादरीकरण केले. या प्रकल्पामुळे नाशिकचे केवळ दळणवळणच नाही, तर संपूर्ण अर्थचक्र बदलून जाणार असून अहमदाबाद- मुंबई- पुणे- हैदराबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) विस्तारीकरण प्रकल्पाचा थेट फायदा आता नाशिकला मिळणार आहे. या प्रकल्पाच्या मुख्य मार्गाला नाशिक फिडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात येणार असून, यामुळे नाशिककरांना मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही शहरे अवघ्या दीड ते दोन तासाच्या संपर्कात येणार आहेत.
Hydrogen Train: जर्मनीत ट्रेन बंद होण्याच्या मार्गावर, जपानमध्ये प्रयोग सुरुच; तरी भारतात सर्वात लांब ‘हायड्रोजन ट्रेन’ला मंजुरी
वाइन, कृषी उद्योगाला मिळणार चालना
नव्या कनेक्टिव्हिटीचा सर्वाधिक फायदा नाशिकमधील कृषी प्रक्रिया उद्योग, वाइन टुरिझम, औद्योगिक कॉरिडोर आणि जलद मालवाहतुकीला होणार आहे. याशिवाय पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे नाशिकमधील हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट आणि स्थानिक गाइडच्या व्यवसायात मोठी उलाढाल होईल. सोबतच द्राक्ष, कांदा आणि इतर नाशवंत शेतमाल जलदगतीने मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचवता येणार असल्याने नाशिकची आर्थिक भरभराट होणार आहे.
Mumbai Water Metro: मुंबईत 16 मार्गांवर धावणार ‘जल मेट्रो’, पहिली बोट शहरात दाखल; दोन मार्गांवर सेवा सुरू होणार
अहमदाबाद- मुंबई- हैदराबाद या विस्तारित बुलेट ट्रेनला नाशिक फिडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे हायस्पीड कॉरिडोरमुळे ‘ ठाणे- पुणे- नाशिक’ असा नवा त्रिकोणीय प्रादेशिक विकास आकारास येत आहे. या सुवर्णत्रिकोणामुळे नाशिक महापालिकेच्या हद्दीत आणि संपूर्ण जिल्ह्यात आर्थिक क्रांती होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाला नवी झळाळी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा