• Sat. Jun 6th, 2026
    लोणावळ्यात 450 फूट खोल दरीत पडून नौदल कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; व्हिडिओ कॉलवर बोलणं महागात, काय घडलं?

    Pune Lonavala Accident Tragedy: लोणावळ्याजवळील प्रसिद्ध ‘टायगर पॉइंट’ येथील ४५० फूट खोल दरीत पडून एका नौदल कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    नौदल कर्मचाऱ्याचा दरीत पडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, लोणावळा: लोणावळ्याजवळील आयएनएस शिवाजी येथील एका नौदल कर्मचाऱ्याचा प्रसिद्ध असलेल्या ‘टायगर पॉइंट’ येथील साडेचारशे फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. आपल्या मुलांना व्हिडिओ कॉलवर येथील परिसरातील दृश्य दाखवताना तोल गेल्याने दरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    राकेशकुमार मिश्रा (वय ५०, सध्या रा. आयएनएस शिवाजी, कुरवंडे, लोणावळा ) असे या नौदल कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेशकुमार हे ‘आयएनएस शिवाजी’ येथे नौदलात कार्यरत होते. ते गुरुवारी दुपारी टायगर पॉइंट येथे मित्रासोबत फिरण्यासाठी आले होते. या वेळी ते टायगर पॉइंट परिसरात फिरत असताना दरीच्या कडेला उभे राहून त्यांच्या मुलांना मोबाइलवर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून येथील दृश्य दाखवत होते. या वेळी त्यांचा अचानक तोल गेल्याने ते सुमारे साडेचारशे फूट खोल दरीत पडले.

    Maharashtra TimesRohit Pawar: तपास होणारच नसेल तर, CID कार्यालयाला टाळे ठोका! दादांच्या अपघात प्रकरणावरुन रोहित पवार आक्रमक
    स्थानिकांनी या घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली. तर त्यांच्या मित्राने आयएनएस शिवाजी येथे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. गणेश गायकवाड, पिंटू मानकर, निलेश गराडे आणि सुनील गायकवाड यांनी शोधमोहीम राबवून मिश्रा यांचा मृतदेह बाहेर काढून संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा येथील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

    Maharashtra TimesPune Liquor Case: विषारी दारुमुळे दोघांना अंधत्व; मिथेनॉलमिश्रित दारुचे भीषण वास्तव समोर, आतापर्यंत 19 जणांनी गमावला जीव
    तर दुसऱ्या रस्त्यावर धोकादायक जागी उभ्या केलेल्या ट्रेलरला छोटा हत्तीची धडक बसून अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावच्या हद्दीत शुक्रवारी (२९ मे) पहाटे घडली. आर्यन अमोल घोडके (वय १७, रा. केतकावळे, ता. पुरंदर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा