Pune Poisonous Liquor Case : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारु प्रकरणात आता मृतांचा आकडा वाढला असून तो २२ झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे काँग्रेसने या प्रकरणामुळे आंदोलन सुरु केले आहे.
‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल
घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे नमूद करून आमदार शंकर जगताप म्हणाले, ‘या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. अवैध धंदे करणाऱ्यांना पाठबळ देणारे किंवा त्याकडे डोळेझाक करणाऱ्या दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तातडीने ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.’
Manoj Jarange Strike : डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती?
‘मूळ सूत्रधारांचा शोध घ्या’
केवळ दारू विक्रेतेच नव्हे, तर या रॅकेटमधील मूळ सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ बेड्या ठोकल्या पाहिजेत. बाधित कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक ती सरकारी मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढे परिसरात रात्री अकरानंतर सर्व दुकाने सक्तीने बंद ठेवण्याचे आणि पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात कोणतीही चालढकल किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, सर्व दोषींना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे जगताप यांनी सांगितले.
‘उच्चस्तरीय चौकशी करा’
‘एकाच परिसरातील नागरिकांचा एकाच दिवशी अचानक मृत्यू होणे ही सामान्य बाब नसून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी; तसेच सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी,’ अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.
Pune Liquor Case: विषारी दारुमुळे दोघांना अंधत्व; मिथेनॉलमिश्रित दारुचे भीषण वास्तव समोर, आतापर्यंत 19 जणांनी गमावला जीव
‘कडक कारवाईची गरज’
महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘या कठीण प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तत्काळ ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरातील अवैध दारू व्यवसाय, अमली पदार्थांची तस्करी व इतर बेकायदा धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने कठोर मोहीम हाती घ्यावी.’
‘अनेक टोळ्या कार्यरत’
‘ही केवळ दुर्घटना नसून, अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या बेकायदा कृत्यांचा थेट परिणाम आहे. त्यामुळे प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी व्हावी, रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी,’ अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
काळ उभा ठाकला; पण वेळ आली नव्हती! समृद्धी महामार्गावर लुटारु, अपघातातून ट्रकचालकाची मृत्यूवर मात
पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत
शहरात खुलेआम सुरू असलेल्या बेकायदा हातभट्टी दारू विक्रीबाबत आणि त्यास खतपाणी घालणाऱ्या जबाबदार यंत्रणेवर कठोर कारवाई करण्याबाबत ‘आम आदमी पक्षा’च्या वतीने पोलिस आयुक्तांना लेखी पत्र देऊन आधीच चेतावणी देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या गंभीर इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष केले. जर वेळीच पोलिस आयुक्तांनी कठोर पावले उचलली असती, तर आज निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला नसता. या दुर्दैवी मृत्यूंना पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि निष्क्रियताच जबाबदार आहे,’ असा आरोप ‘आप’ने केला आहे.
