अय्याज ताज मदारे (वय २६, रा. ब्राह्मणी फाटा, कळमेश्वर) व आमीन शेख (वय ३०, रा. कळमेश्वर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हजरत मौलाना (रा. तामिया, छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे फरार आरोपीचे नाव असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Nagpur News : खेळता खेळता 11 वर्षीय मल्हारसोबत नेमकं काय घडलं? बंद खोलीचं दार उघडताच कुटुंबीयांना जबर धक्का
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, २४वर्षीय विवाहितेचा पती वायुसेनेत कार्यरत असून, बाहेरगावी तैनात आहे. ही विवाहिता प्रॉपर्टी डिलिंगचे काम करते. अय्याज हा विवाहितेचा वर्गमित्र आहे. फेब्रुवारी २०२५मध्ये त्याने प्लॉट खरेदीसाठी विवाहितेशी संपर्क साधला. प्लॉटबाबत बोलणी करायची असल्याचे सांगून त्याने तिला वर्धा मार्गावरील हॉटेल इम्पीरियल ग्रीनमध्ये नेले. खोलीत गेल्यावर त्याने तिला गुंगीचे औषध असलेला ज्युस प्यायला दिला. विवाहितेने तो प्यायला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. अय्याजने तिच्यावर बलात्कार केला.
मोबाइलद्वारे याचे चित्रीकरण केले व छायाचित्रही काढले. त्यानंतर आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिचे शारीरिक शोषण करायला लागला. यादरम्यान तो तिला बाटलीतील द्रव्य मिसळलेले पाणी बळजबरीने प्यायला लावायला लागला. मुस्लिम धर्माची आयत बोलून तो त्या पाण्यात फुंकर मरायचा. त्यानंतर तो तिचे शोषण करायचा. तो सतत मुस्लिम धर्म स्वीकारण्याबाबत विवाहितेवर दबाव टाकत होता. मात्र, विवाहिता त्याला नकार द्यायची.
Nagpur Bribe Case: नागपुरात ACBची मोठी कारवाई; चेक पोस्टवर 500 रुपयांची लाच घेताना RTO निरीक्षकासह दोघे अटकेत
३१ मे रोजी त्याने फिरायला जाण्याच्या बहाण्याने विवाहितेला बळजबरीने कारमध्ये बसविले. तो तिला कळमेश्वर येथे घेऊन गेला. येथे आमीन व हजर मौलासोबत तिची भेट घालून दिली. तिघांनी तिला काळोख असलेल्या ठिकाणी नेले. हजरतने हिंदी व उर्दू भाषेत मंत्र म्हटले. तिच्या अंगावर काहीतरी शिंपडून तिला संमोहित केले. नंतर ‘कबूल हैं कबूल हैं’ असे तिला बोलायला लावले. धर्मपरिवर्तन झाल्याचे हजरतने तिला सांगितले. त्यानंतर अय्याजने तिच्यावर अत्याचार केला व कारने घरी सोडून दिले.
पतीकडे मांडली कैफियत
अय्याज सतत शारीरिक शोषण करीत असल्याने विवाहिता तणावात राहायला लागली. तीन दिवसांपूर्वी तिचा पती घरी आला. तिने पतीला विश्वासात घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पतीसह सोनेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार, धर्मांतरणाचा प्रयत्न व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून अय्याज व आमीनला अटक केली. पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची पाच दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.
Nagpur Crime: ‘लव्ह ट्रँगल’चा भयानक शेवट; एकाला निर्घृणपणे संपवलं, दोन आरोपी अटकेत, टीपू सुलतान चौकाजवळील घटना
पोलिसांकडून कसून तपास
अत्याचार, धमकी, पैशांनी लुटणे आणि धर्मांतराचा दबाव अशा स्वरूपाच्या आरोपांतील प्रकरणांमध्ये पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक पुरावे, मोबाइल चॅट, लोकेशन, सीसीटीव्ही, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांना विशेष महत्त्व दिले जाते. कथित चित्रीकरण, पैशांची देवाणघेवाण आणि प्रवासाशी संबंधित पुरावेही तपासाचा भाग ठरतात. तसेच पीडितेच्या निवेदनासोबत उपलब्ध तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविली जाते. या प्रकरणातही पोलिसांकडून विविध बाबींची तपासणी सुरू असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
