Samruddhi Highway Accident: मुंबईहून रायपूरकडे निघालेल्या ट्रकचालकाने मोठ्या धाडसाने लुटारु अन् अपघातातून मृत्यूवर मात केली. काय घडलं नेमकं?
शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास नागपूर कॉरिडॉर वरील किलोमीटर ५७९.७ परिसरात अंधारातून अचानक काही लुटारू समोर आले. त्यांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. चालक राजबहादूर गंगाप्रसाद यादव (२३, रा. बरेठी, जि. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) याने प्रसंगावधान राखून ट्रक पुढे दामटला. मात्र, यानंतर दरोडेखोरांनी दगडफेक सुरू केली. एक दगड थेट चालकाच्या डोक्यावर आदळला; तर क्लीनर ब्रह्मा हिरालाल जाटव (४०, रा. डिघरूआ, जि. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) यांच्या डोक्यावर लोखंडी दांडक्याने प्रहार करण्यात आला. काही क्षणांतच चालकाचे नियंत्रण सुटले आणि १४ टायरचा ट्रक थेट ३० फूट खोल काँक्रिटच्या डक्टमध्ये कोसळला. ट्रक खाली पडताच आवाज झाला आणि काही सेकंदांतच ज्वाळांनी ट्रकला वेढले.
Nashik News : गरोदर आईसह बाबा बुडाले, चिमुकली धरणाकडे बोट दाखवत निघाली; कुस्ती स्पर्धा सोडून पैलवान धावले, पण चौघांनी प्राण गमावलेच
अपघातानंतर क्लीनर ब्रह्मा जाटव कसाबसा बाहेर पडला. मात्र, चालक राजबहादूर यादवचा उजवा पाय स्टिअरिंगखाली अडकला होता. त्या क्षणी ‘आता आपण जिवंत बाहेर पडणार नाही…’ ही भीती यादवच्या मनात होती. मात्र, मृत्यू समोर दिसत असतानाही पूर्ण ताकद लावून त्याने पाय खेचला आणि जळत्या ट्रकमधून बाहेर पडण्यात यश मिळवले.
Nida Khan : तुमच्या नव्या घरी एक गरोदर पाहुणी ठेवायची आहे, पटेलचा फोन; ‘त्या’ सकाळी हनिफभाईची बायको स्वतःचंच घर टीव्हीवर पाहून म्हणाली…
जवान ठरले देवदूत
घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग सुरक्षापथक, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षा बलाचे जवान समाधान पाटील, स्वाधीन पवार आणि रवींद्र पवार यांनी मदतकार्य केले. सिन्नर पोलिस ठाण्याचे कर्मचारी राहुल इंगोले आणि राजू मोरे यांनीही मदतकार्य करीत बचाव मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान, पोलिसांपुढे ‘समृद्धी’वरील लूट रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
