• Fri. Jun 5th, 2026
    Pune Liquor Case : डोळ्यांची जळजळ, चक्कर अन् तोंडातून फेस, पुण्यातील विषारी दारु प्रकरणात मृतांचा आकडा वाढला; मोठमोठे अधिकारी निलंबित

    Pune Pimpri Chinchwad Poisonous Liquor Case : ‘पुणे विषारी दारू कांड ही एक प्रकारे केलेली हत्याच आहे. त्यामुळे या घटनेत अतिशय कठोर कलमे लावण्यात येत असून, या प्रकरणाची सर्व पाळेमुळे खणून काढण्यात येतील. ही सारी इकोसिस्टिम नष्ट करण्यात येईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पोलिस आयुक्तांकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

    पिंपरी चिंचवड विषारी दारु प्रकरण १९ जणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारू प्यायल्याने गेल्या दोन दिवसांत १९ जणांचा मृत्यू झाला. दापोडी-फुगेवाडी परिसरातील १३ आणि हडपसर परिसरातील सहा जणांचा यात समावेश आहे. अनेकजण गंभीर अवस्थेत विविध रुग्णालयांत उपचार घेत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने १० जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे.

    ‘पीआय’सह तिघे निलंबित

    विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पाच अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त यांनी याबाबतचे आदेश काढले. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, सहायक निरीक्षक हसीन सिकलगार आणि उपनिरीक्षक हसन मुलाणी अशी पुणे पोलिसांतील निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे, उपनिरीक्षक राजू भास्कर, कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव, विशाल काळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesPune Hooch Tragedy : कुणाची चार लेकरं पित्याला मुकली; कुणाच्या आईमागून वडिलांचा मृत्यू, पुण्यातील विषारी दारुकांडाने 19 संसारांची राख

    नागरिकांनी गावठी दारू प्यायली

    दापोडी परिसरातील एका हातभट्टी अड्ड्यावर मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी नागरिकांनी गावठी दारू प्यायली. त्यांना डोळ्यांची जळजळ, चक्कर येणे, अंधारी येणे, श्वसनास त्रास, छातीत दुखणे आणि तोंडातून फेस येणे अशी लक्षणे जाणवली. काहींची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) बुधवारी बाबा शेख (वय ४५) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी राजेश शांताराम राजपूत (५०), अकबर अझीमखान पठाण (४८), आनंद पांडेराव देसाई (५३), आनंद काशिनाथ निकाळजे (६४), पांडुरंग सखाराम फुगे (५३), विजय प्रकाश राठोड (३१), राजेंद्र प्रकाश राठोड (३४) या सात जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी अक्षय अशोक अवसरमल (२८), सचिन रामचंद्र नेटके (३६), भीमण्णा बसन्ना नागराल (२७) आणि सुरप्पा मनप्पा बंगारी (वय ५५) आणि कबीर अब्दुल शहा (वय ४५, रा. फुगेवाडी) यांचा मृत्यू झाला.

    व्हिसेरा लवकरच फॉरेन्सिक लॅबकडे

    हडपसर परिसरात अरुण वामन डाडर (वय ६०), यशवंत रघुनाथ पवार (वय ६४), दत्ता माधवराव सूर्यवंशी (वय ५५) आणि अशोक रमेश चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर विजय भुकूरलाल शर्मा (वय ४५) आणि प्रवीण जाधव (वय ५२) यांचाही दारू पिऊन मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे पोलिस आणि दापोडी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह आठ ते १० जणांना अटक केली आहे. फुगेवाडी आणि हडपसर परिसरात मिथेनॉल मिसळून गावठी दारू तयार करून विक्री केल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आला आहे. सर्व मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा व्हिसेरा लवकरच फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला आहे. त्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
    Maharashtra Timesमुंबईतील झाडं तोडून पनवेलमध्ये पुनर्रोपण, Versova-Dahisar Coastal Roadसाठी १,२०० झाडं तोडण्यास मंजुरी

    कोणाकोणाला अटक?

    कर्नेलसिंह तखतसिंह विरका (७३), गुरमंगतसिंह कर्नेलसिंह विरका (४५), योगेश रामचंद्र वानखेडे उर्फ सिंकदर राठोड हा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दारूमधील ‘मिथेनॉल’मुळे या रुग्णांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांसह न्यावैद्यक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अल्पावधीत झालेल्या संशयास्पद मृत्यूंमधील रुग्णांमध्ये चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास, तोंडातून फेस येणे, धूसर दिसणे, गुंगी येणे, छातीत दुखणे आणि हृदयाचे ठोके मंदावणे अशी समान लक्षणे आढळून आली आहेत. या संपूर्ण प्रकरणात मिथेनॉलचा पुरवठा कुठून झाला, अवैध दारू विक्रीला कोणाचे संरक्षण होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सीआयडी करणार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा