• Mon. Sep 7th, 2026
पुढील सात दिवसांत मान्सूनचे आगमन होणार, रविवारपासून मुंबईत हलक्या सरी; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather: मुंबईत उन्हाचा पारा चढत असताना नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या सात दिवसांत देशात मान्सूनचे आगमन होणार असून रविवारपासूनच हलक्या सरींना सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या मान्सूनचा दुसऱ्या दीर्घकालीन पूर्वानुमानामध्ये राज्यातील पावसाचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, संपूर्ण पावसाळाभर राज्यात सरासरीहून मोठ्या फरकाने कमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सरासरीइतका पाऊस पडू शकेल. कोकणामध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जून महिन्यातही राज्यात पाऊस सरासरीहून कमी असेल.

३० टक्क्यांपेक्षा फरक

यंदाच्या पावसाळ्यात देशभरात बहुतांश ठिकाणी सरासरीहून कमी पाऊस पडू शकेल. देशाचे उत्तर टोक, ईशान्येकडील तुरळक भाग, तसेच आग्नेय दिशेकडील काही भाग येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकेल. हे भाग वगळता संपूर्ण देशात सरासरीहून कमी पाऊस पडेल. राज्यातही पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक फरकाने पाऊस कमी पडेल, असा अंदाज दुसऱ्या दीर्घकालीन पूर्वानुमानामध्ये वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत संपूर्ण मोसमामध्ये सरासरीपेक्षा ६५ टक्क्यांहून अधिक तूटही जाणवू शकेल. कोकणामध्येही पावसाची मोठी तूट जाणवू शकेल.

Maharashtra TimesMonsoon Prediction: जून महिन्यात ‘एल निनो’ सक्रिय होणार, सरासरीच्या 90 टक्के पाऊस; ‘आयएमडी’च्या ताज्या अंदाजामुळे शेतकरी अडचणीत

राज्यात पावसाची तूट जाणवायला जूनपासूनच सुरुवात होईल. या महिन्यात आग्नेय सीमेचा काही भाग वगळता अतिरिक्त पाऊस नोंदला जाण्याची शक्यता नसल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजावरून दिसत आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीइतका पाऊस असू शकेल. मात्र, सर्वसाधारणपणे कोकणासारख्या विभागात पावसाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये भरपूर पाऊस पडतो. काही वेळा या विभागात अतिरिक्त पाऊस नोंदला जातो. मात्र यंदा जूनमध्ये कोकण विभागातही ३३.५ ते ४५ टक्के यादरम्यान पावसाची तूट असेल. या कालावधीत पावसाकडून दिलासा नसल्याने तापमानदिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. जूनमध्ये कोकण विभागात सरासरीहून अधिक कमाल तापमान नोंदले जाईल, तर मध्य महाराष्ट्रात याचे प्रमाण सरासरीहून मोठ्या फरकाने अधिक असू शकते.

पुढील सात दिवसांत मान्सूनचा प्रवेश

दरम्यान, देशात मान्सून पुढील सात दिवसांत कोणत्याही क्षणी दाखल होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या नेमकी तारीख सांगता येत नसली तरी केरळ आणि दक्षिण भारतातील काही भाग असेही पुढील आठवड्यात मान्सूनच्या प्रभावाखाली येतील, ‘आयएमडी’ ने स्पष्ट केले.

Maharashtra TimesMonsoon Update: राज्यात मोसमी पावसाचे आगमन लांबणीवरच, दोन आठवडे अल्प पावसाचा अंदाज; मुंबईत कधी दाखल होणार मान्सून?

पालघर, ठाण्याला ‘यलो अलर्ट’

मुंबईमध्ये रविवारपासून तीन दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी हलक्या ते मध्यम सरी आणि सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथेही सोमवार, मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा