Pimpri Chinchwad Poisonous Liquor Case : एक्साईज विभागाला याबाबत आधी माहिती नव्हती का? दापोडी पोलिसांना या प्रकाराची कल्पना नव्हती का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. संबंधित यंत्रणांनी वेळेत कारवाई केली असती तर निष्पाप नागरिकांचे जीव वाचले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
‘माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी ही दारु तयार झालेली आहे, ते त्यांनी शोधून काढलेलं आहे. याच्यापाठीमागे जे लोकं आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे. अजून काही लोक या प्रकरणात असू शकतात, ते शोधण्याचं काम सुरु आहे. जे लोक आता गंभीर आहे, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एकूणच ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्याठिकाणी ही दारु तयार झालेली आहे, त्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. आठ लोकांना अटक करण्यात आली आहे, अजून काहींना अटक होऊ शकते’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, ‘संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कारण ही एकप्रकारे हत्याच आहे. त्यामुळे, अतिशय कडक कलमं त्यांच्यावर लावण्यात येणार आहेत. यामध्ये मिथेनॉलसारखाच विषारी पदार्थ वापरण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Tuljabhawani Temple Sanstha : तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत तब्बल 48 कोटी रोकड, गेल्यावर्षी 10 किलो सोनं दान; भाविकांच्या सोयीसाठी खर्च
नेमकं प्रकरण काय?
आधी फुगेवाडी येथील सहा मृतांपैकी चार जणांचा मृत्यू हा हृदयविकारासह इतर कारणांमुळे झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. मात्र, या सर्वांचा मृत्यू केमिकलयुक्त दारु प्यायल्याने झाला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, फुगेवाडी आणि हडपसरमधील काळेपडळ परिसरात स्पिरिट म्हणजेच केमिकलयुक्त दारू पुरवणाऱ्या योगेश वानखेडे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश वानखेडे हा केमिकलयुक्त गावठी दारू तयार करण्याचा व्यवसाय करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने फुगेवाडी आणि काळेपडळ परिसरात ही दारू पुरवल्याचं समोर आलं आहे.
Crop Insurance: पावणेदोन लाख दावे नाकारले; ‘पीक विमा’ अमरावती जिल्ह्यातील बळीराजाच्या मुळावर
एक्साईज विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी
या दारूमुळे फुगेवाडी येथे सहा जणांचा आणि काळेपडळ येथे पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे एक्साईज विभागाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. योगेश वानखेडे हा एक्साईज विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी देखील त्याच्यावर 2023, 2024 आणि 2025 या वर्षांमध्ये केमिकलयुक्त दारू प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तरीदेखील त्याच्यावर कठोर कारवाई झाली नसल्यानेच आजही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
