Mumbai Coastal Road: एकही रुपया खर्च न करता महापालिका कोस्टल रोडवर 60,000 झाडांची लागवड करणार आहे. येत्या 2-3 वर्षांत हे काम पूर्ण होणार असून 15,000 झाडं तर मान्सूनपूर्वीच लावायचं उद्दिष्ट आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: कोस्टल रोडच्या शेजारी लवकरच निसर्गरम्य बागा तयार होणार आहे. मुंबईकरांचा श्वास मोकळा होणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने मार्गाशेजारील मोकळ्या जागेवर 60,000 झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वरळी आणि ब्रीट कँडी परिसरात यापूर्वीच काम सुरू झालं आहे. मान्सूनपूर्वी तब्बल 15,000 वृक्षांची लागवड करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे.
2-3 वर्षांत कायापालट
सध्या मार्गालगतच्या मातीची तपासणी करून जमीन तयार करण्यात येत आहे. यानंतर कोणती झाडं या ठिकाणी सर्वाधिक काळ टिकून राहतील याची तापसणी करून लागवड सुरू केली जाणार आहे. येत्या काही वर्षांत टप्प्या-टप्प्याने ही 60,000 झाडं लावण्याचं काम केलं जाईल. याशिवाय रस्त्यालगत 2,00,000 झुडुपंही उगवण्याची योजना आहे.
Monsoon Update: राज्यात मोसमी पावसाचे आगमन लांबणीवरच, दोन आठवडे अल्प पावसाचा अंदाज; मुंबईत कधी दाखल होणार मान्सून?
कोस्टल रोडच्या (दक्षिण) 10.6 किमी लांब मार्गासाठी समुद्रातून तब्बल 111 हेक्टर जमीन मिळवली गेली आहे. यापैकी 40 हेक्टर जमीन रस्ते, इंटरचेंजेस आणि पुलांसंदर्भातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वापरण्यात आली आहे. उर्वरित भागात नागिरकांसाठी मोकळी जागा तयार करण्यात येणार आहे. या मोकळ्या जागेत विहार, बागा, शहरी वन आणि सायक्लिंग ट्रॅक किंवा पदपथं बनवण्यात येतील. वृक्ष लागवडीसाठी दोन नर्सरी विकसित केल्या जात आहे. वरळीमधील नर्सरी यापूर्वीच कार्यरत असून ब्रीच कँडी परिसरातील नर्सरीचं लवकरच सुरू होईल. वरळीस्थित नर्सरीमध्ये झाडं, झुडुपे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची चाचणी केली जात आहे. किनारपट्टीवरील खारट आणि दमट वातावरणाला कोणती झाडं सकारात्मक प्रतिसाद देतात याचा अभ्यास सुरू आहे.
काय आहे प्रक्रिया?
“ही पुनर्प्राप्त केलेली जमीन असल्यामुळे लँडस्केपिंग सुरू होण्यापूर्वी मातीला तयार करणं महत्त्वाचं आहे. या भागांत मुरम मातीचे थर लावून माती भरण्याचं काम करणार आहेत. जमिनीखाली 900 मिमीमीटर जमीन या कामासाठी राखीव ठेवली होती. यापूर्वी जमीनीवर 400 मिलीमीटर मुरमाचा थर लावला असून वृक्ष लागवडीसाठी माती आणण्याचं काम सध्या सुरू आहे,” अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
Mumbai BEST Bus: ‘बेस्ट’ची कोंडी फोडण्यासाठी नवे नियोजन, दादरमधील बसचे मार्ग बदलणार; प्रवाशांना फटका बसणार
एका CSR उपक्रमांतर्गत रिलायन्स फाउंडेशनला हे काम देण्यात आलं आहे. त्यामुळे महापालिकेला यासाठी कुठलाही खर्च होणार नाही. बीएमसीचे माजी आयुक्त भूषण गगरानींच्या उपस्थितित फेब्रुवारी महिन्यात ‘कोस्टल रोड गार्डन’चा प्रस्ताव मांडण्यात आला होता. येत्या 24 महिन्यांमध्ये सर्व लँडस्केपिंग प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त महालक्ष्मी मंदिराजवल आध्यात्मिक क्षेत्र तयार करण्याचीही योजना आहे. त्यानंतर हाजी अली पुलाखाली टेनिस आणि बॅडमिंटन कोर्टासह लहान मुलांसाठी खेळण्याची जागा विकसित करण्याचाही महापालिकेचा विचार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा