• Sat. Jun 6th, 2026

    Vidhan Parishad Election: नाशिकवर दावे-प्रतिदावे; विधान परिषदेसाठी भाजपचे गणेश गिते, नीलेश बोरांचे आज अर्ज

    Vidhan Parishad Election: नाशिकवर दावे-प्रतिदावे; विधान परिषदेसाठी भाजपचे गणेश गिते, नीलेश बोरांचे आज अर्ज

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत भाजप आणि शिवसेनेतील पेच सुटला नसतानाच, भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते आणि शहर उपाध्यक्ष नीलेश बोरा शुक्रवारी (दि. २९) अर्ज दाखल करणार आहेत. एकीकडे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार नरेंद्र दराडेंनी प्रचार सुरू केला असतानाच, गितेंनी रिंगणात उडी घेतली असून, भाजपकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीत द्विस्ट निर्माण झाला असून, महायुतीमध्ये या उमेदवारीवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

    विधान परिषदेसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन चार दिवस लोटले तरी, महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप ठरत नसल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे. तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यापैकी एक जागा भाजपला हवी आहे. त्यामुळे हा वाद जागेवरून महायुतीचे घोडे अडल असून, हा वाद थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहचला आहे. हा वाद सुटेल असा दावा केला जात असून, नाशिकमध्ये शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. तर सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्तेही रिंगणात आहेत.

    Vidhan Parishad Election: भाऊ, तुम्ही लढाच; मागे हटू नका! विधान परिषद बिनविरोध टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींचे देव पाण्यात
    भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने ही जागा भाजपला मिळावी यासाठी मंत्री गिरीश महाजन यांसह वरिष्ठांनाही पदाधिकाऱ्यांनी जागेचा हट्ट धरला. भाजपकडून माजी सभापती गणेश गिते, नीलेश बोरा, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, सोनिया होळकर, भूषण कासलीवाल आदी इच्छुक आहेत. परंतु, अद्यापही या जागेबाबत तिढा कायम आहे. हा तिढा कायम असतानाच इच्छुक असलेल्या माजी सभापती गिते, शहर उपाध्यक्ष बोरा यांनी थेट मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. ते दोघेही आज (दि. २९) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

    Maharashtra TimesMLC Election: विधानपरिषदेच्या तीन जागांवरून महायुतीत संघर्ष, वाद थेट अमित शहांपर्यंत गेला; नाशिकसह आणखी कोणत्या दोन ठिकाणी चढाओढ?
    शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले लक्ष
    भाजप शिवसेनेत जागावाटपाचा तिढा सुटत नसतांना आणि शिवसेनेकडून जागेवर दावा केला जात असतांनाच, भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीतल्या दोन घटकपक्षांमध्येच तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपच्या इच्छूकांकडून थेट अर्ज दाखल करण्यास सुरूवात केले आहे. त्यात गितेंनी थेट अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून आहे.

    विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा शब्द मला वरिष्ठांनी दिला आहे. त्यानुसार मी आज, शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष निवडणूक लढवणार आहे. – गणेश गिते, माजी सभापती, स्थायी समिती, नाशिक मनपा

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed