• Sat. Jun 6th, 2026

    Ebola Virus Outbreak 2026: नव्या आजाराचा धोका! आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक, भारत अलर्ट मोडवर, सरकारकडून कोणते आदेश देण्यात आले?

    Ebola Virus Outbreak 2026: नव्या आजाराचा धोका! आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक, भारत अलर्ट मोडवर, सरकारकडून कोणते आदेश देण्यात आले?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे इबोला आजाराचा उद्रेक झाल्यानंतर भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील इबोलासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची, तसेच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत या रुग्णांची देखरेख करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

    राज्यातील आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, विमानतळ तसेच इतर यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधण्यात येत आहे. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष, विशेष रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळांमधील सुविधा, अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय उपचारांच्या सुविधेची उपलब्धता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयांमध्ये या आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमानतळावरील यंत्रणेचा आरोग्ययंत्रणेशी समन्वय आहे, तसेच राज्य व जिल्हा पातळीवरील सर्वेक्षण विभागाकडूनही यासंदर्भातील माहिती देण्यात येत आहे.

    मुंबई महापालिकेकडून मुंबईतील सर्व पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. इबोला हा प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या रक्त, शारीरिक स्त्राव, उलटी किंवा दूषित वस्तूंशी थेट संपर्कातून पसरतो. हा संसर्ग सामान्य परिस्थितीत हवेतून पसरत नाही. तसेच कोविड-१९इतका सहज संसर्गजन्य नाही, असे या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे. मानक संसर्ग नियंत्रण पद्धतींचे पालन करणे, योग्य हात स्वच्छता राखणे, सार्वत्रिक प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे, बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करणे, तसेच अनावश्यक भीती टाळून व्यावसायिक तयारी ठेवण्याचे आवाहन निवासी डॉक्टरांना करण्यात आले आहे.

    देशात इबोलाचा उद्रेक किंवा समुदायस्तरावर या आजाराचा प्रसार नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे महापालिकेच्या ‘मार्ड’ने स्पष्ट केले आहे. करोनासंसर्गामध्ये महापालिकेच्या निवासी डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिशय धडाडीने काम केले होते. त्यामुळे भविष्यात अशी गरज भासल्यास सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना प्रतिबंधात्मक तयारी, सर्वेक्षण उपक्रम, संसर्ग नियंत्रण उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *