• Mon. Jun 15th, 2026

    Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांसाठी काही दिवस बंद राहणार? सिंहस्थच्या कामांमुळे निर्णय घेतला जाण्याची शक्यता

    Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांसाठी काही दिवस बंद राहणार? सिंहस्थच्या कामांमुळे निर्णय घेतला जाण्याची शक्यता

    Nashik News: रस्ते खोदकामांनी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. भाविक पर्यटकांना असुविधांचा सामना करावा लागत असल्याने याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे.

    त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांसाठी काही दिवस बंद राहणार? सिंहस्थच्या कामांमुळे निर्णय घेतला जाण्याची शक्यता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे सुरू झालेली रस्त्याची कामे आणि त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ, त्यात मंदिराच्या जवळ होत असलेले दर्शनपथाचे काम या सर्वांचा एकत्रिक विचार करता त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांसाठी काही दिवस बंद ठेवण्याची शक्यता आहे.

    अधिक महिना संपताच २१ जूनपासून मंदिरासमोरचे व्यावसायिक संकुल पाडण्यास प्रारंभ होईल, तसेच शहरातील आजूबाजूच्या सर्व रस्त्यांचे काम सुरू झालेले असेल. साहजिकच भाविकांना मंदिरात पोहोचणे अवघड होत आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वर्दळीने निर्माण होणारा व्यत्यय दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यावर मर्यादा आणत आहे. यापूर्वी कोव्हिड लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद होते. ते वगळता वज्रलेप करण्यासाठी ५ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान मंदिर बंद ठेवण्यात आले होते. आता ‘देऊळबंद’चा दुसरा प्रयोग होण्याची शक्यता आहे.

    त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील देवस्थान ट्रस्टचे भाडेकरू असलेली दुकाने हटवण्यात आली आणि भाविकांना खाद्यपेय, चहापाणी मिळणे अवघड झाले आहे. तशात आता वाहनतळ ते मंदिर हा रस्ता खोदला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या दुकानांपर्यंत पोहोचणे भाविकांना शक्य होत नाही. शिवनेरी धर्मशाळा व्यावसायिक संकुल पाडल्यानंतर तेथे पत्र्याचे बॅरिकेडिंग केले, तेव्हापासून मंदिराचा पूर्व दरवाजावरील दर्शनबारी आणि २०० रुपये दर्शनबारीत जाण्यासाठी भाविकांना रस्ता नाही. शनी मारुती मंदिरापासून आत जाऊन तेथून दर्शनबारीच्या प्रवेशद्वारी पोहोचताना भाविकांची दमछाक होते. त्यातही २०० रुपये तिकीट घेतलेले भाविक शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी जमेल तेथे उभे राहतात आणि या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असते.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा