Mumbai News: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने २६ जानेवारी ते २० मे २०२६ या कालावधीत वातानुकूलित लोकलच्या एकूण आठ हजार ९९१ फेऱ्या चालवल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत सहा हजार ८३४ फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. एसी फेऱ्यांमध्ये ३१.६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
एसी लोकल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: यंदाच्या उन्हाळ्यात तापमानात झालेली वाढ मध्य रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या पथ्यावर पडली आहे. उन्हाळ्या झळा असह्य होत असल्याने, प्रवासी मोठ्या संख्येने एसी लोकलकडे वळू लागले आहेत. यंदाच्या पाच महिन्यांत मुख्य आणि हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलमधून एक कोटी ५० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या एक कोटी होती. म्हणजेच एकूण प्रवाशांच्या संख्येत ५० टक्क्यांनी भर पडली आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर आणि टिटवाळा या मुख्य मार्गावर चालवल्या जाणाऱ्या एसी लोकलची संख्या दररोज ८० एवढी आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल मार्गावर २६ जानेवारी २०२६पासून १४ एसी लोकल फेऱ्या सुरू झाल्या. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याने त्यात आणखी १४ फेऱ्यांची भर पडली. म्हणजेच, सद्यस्थितीत मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर एकूण १०८ एसी लोकल फेऱ्या धावत आहेत.
दैनंदिन प्रवाशांच्या सरासरी संख्येतही वाढ झाली आहे. २०२५मध्ये एसी लोकलमधून सरासरी ८७ हजार ५९६ प्रवासी दररोज प्रवास करत होते. आता हा आकडा वाढून एक लाख ३० हजार ७५ पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच दैनंदिन प्रवाशांच्या संख्येमध्ये ४८.५ टक्के वाढ झाली आहे.
एसी लोकलच्या वाढत्या लोकप्रियतेचा परिणाम महसुलावरही झाला आहे. दररोजचा सरासरी महसूल ३८.५० लाख रुपयांवरून ५६ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर एकूण महसूल ४४.२७ कोटी रुपयांवरून ६४.४० कोटी रुपये झाला आहे. २०२६ मधील मार्च आणि मे महिन्यांत सर्वाधिक गर्दीची नोंद झाली. नव्या मार्गांवरील फेऱ्या आणि वाढलेल्या फेऱ्यांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आरामदायी, सुरक्षित आणि जलद प्रवासाच्या शोधात असलेल्या मुंबईकरांनी एसी लोकलला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा