Nanded Ashok Chavan News : विधानपरिषद निवडणुकीची लगबग आता सुरु झाली आहे. प्रत्येकाने आपली कंबर कसली आहे. त्याचदरम्यान, निकटवर्तीयाच्या उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची चांगलीच धरपड दिसून येत आहे.
राजुरकरांच्या आशा पल्लवित
राज्यातील रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी यंत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे. 2016 मध्ये राजुरकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, त्यात त्यांनी एकूण 472 पैकी 251 मतं मिळवत विजय मिळवला होता. प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांना 208 मतं मिळाले होते. आता अमरनाथ राजुरकर यांना दुसऱ्यांदा विधान परिषद निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. अमरनाथ राजुरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक मानले जातात.
Pune Congress: पुणे काँग्रेसमधील वाद पेटला, सतेज पाटलांबद्दल आक्षेपार्ह मजकुरासह पोस्टरबाजी, वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत!
अशोक चव्हाण पूर्ण ताकदीने मैदानात
अनेक वर्ष राजुरकर यांनी चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमध्ये काम केलं, त्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर त्यांनी देखील पदाचा राजीनामा देत भाजप पक्षात प्रवेश केला. सध्या राजूरकर हे भाजपचे महानगराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. विधान परिषदेची नांदेडची जागा भाजपला सुटणार असल्यानं अमर राजूरकर यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे आपल्याच समर्थकाला उमेदवारी मिळण्यासाठी अशोक चव्हाण हे पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. मागील आठवड्याभरापासून अशोक चव्हाण आणि अमर राजुरकर हे मुंबईत तळ ठोकून असल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजप पक्षातील निष्ठावंताला उमेदवारी देणार की आयाताला? याकडे सर्वांच लक्ष आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची
राज्यातील विधान परिषदेची निवडणूक महायुती एकत्र लढणार आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची भूमिका महत्वाची असणार आहे. नांदेडमध्ये महायुतीमध्ये आलबेल असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राजकारणातील कट्टर विरोधक मानले जातात. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि चिखलीकर यांच्यात जवळीकता वाढली आहे. तेव्हा या दोन्ही पक्षातील नेते भाजप उमेदवाराला समर्थन देतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. संख्या बळानुसार भाजपकडे 138, काँग्रेस 92, राष्ट्रवादी अजित पवार गट 82, मजपा 39, शिवसेना शिंदे गट 23, एमआयएम 20, शिवसेना ठाकरे गट 19, राष्ट्रवादी शरद पवार गट 13 आणि आणि वंचित बहुजन आघाडीकडे 6 असं संख्याबळ आहे.
Rohit Pawar : भ्रष्टाचाराची लवकरच पोलखोल! आमदार रोहित पवारांचा मंत्री गिरीश महाजनांना इशारा, रिंगरोड विरोधात प्रकरण तापणार
काँग्रेस देणार बलाढ्य उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी देखील पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. नांदेडमध्ये काँग्रेस बलाढ्य उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे यापूर्वी नांदेडमध्ये काँग्रेसच वर्चस्व राहिलं असून अमरनाथ राजुरकर हे विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. तेव्हा पुन्हा वर्चस्व कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने निवडणुकीची तयारी देखील सुरु केली आहे. खासदार रविंद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या बैठकीचा सिलसिला सुरु ठेवला आहे.
