चर खोदण्याच्या कामात वाढ झाल्याने चर पुनर्भरणाचा खर्चही वाढला आहे. सबब महापालिकेला या कामासाठी सात विभागांतील कंत्राटाची रक्कम वाढवावी लागत असून दोन वर्षांसाठी चर भरण्याच्या कंत्राटात २४३ कोटींवरून ६१८ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! अप्पर वैतरणाने गाठला तळ; अवघा 5 टक्के पाणीसाठा शिल्लक, इतर धरणांची काय स्थिती?
युद्धामुळे एलपीजीसह पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने पाइपद्वारे नैसर्गिक वायू जोडण्या (पीएनजी) अधिक प्रमाणात देण्यास प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारनेही तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. मुंबईच्या हद्दीत महानगर गॅस लिमिटेड ही एकमेव पीएनजी पुरवठादार कंपनी आहे. त्यामुळे पीएनजी पाइपलाइन व जोडण्यांच्या कामास गती देण्यासाठी महापालिकेने तातडीने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार महानगर गॅसच्या उपयोगिता वाहिन्या (युटीलिटी केबल्स) टाकण्यासाठी रस्त्यावर चर खणण्यास तातडीने परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
याबाबतचे अर्ज २४ तासांत मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबत आधीच जे अर्ज देण्यात आले आहेत व त्यावर निर्णय प्रलंबित असतील तर ते अर्ज मंजूर मानण्यात येणार आहेत. रस्ते व वाहतूक विभागाने ३० मार्च रोजी हे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार मुंबईत मोठ्या प्रमाणावर पीएनजी जोडण्यांसाठी चर खोदण्याच्या कामांमध्ये वाढ झाली आहे. स्थायी समितीत येणार प्रस्ताव मुंबईत विविध नागरी सुविधा पुरविण्यासाठी अंतर्गत व बाह्य उपयोगिता सेवा संस्थांकडून (युटिलिटी कंपनी) रस्त्यावर चर खोदले जातात. विद्युत वाहिन्या, इंटरनेट जोडणी, गॅस जोडणी यासाठी रस्ते खोदले जातात. या चरांची पुनर्भरणी करण्यासाठी महापालिकेमार्फत सर्व सातही परिमंडळांसाठी कंत्राटदारांची नेमणूक केली जाते.
महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाने ऑक्टोबर, २०२५ मध्ये दोन वर्षांसाठी कंत्राटदार नेमले आहेत. सातही परिमंडळांतील कंत्राटदारांना मिळून २४३ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट ऑक्टोबर, २०२७ पर्यंत चालणारे आहे. सात परिमंडळांसाठी हा खर्च २४३ कोटींवरून ५८३ कोटी रुपयांवर गेला आहे. तर सर्व करांसह हा खर्च ६१८ कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
दादरमधील डॉक्टर ब्रिटनमध्ये महापौर; डॉ. नितीश राऊत यांच्याकडे ‘सटन कोल्डफिल्ड’ची धुरा
धोरणात बदल करणार
नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या वाहिन्या, जलवाहिन्या, सांडपाण्याच्या वाहिन्या, पावसाळ्यात भरणाऱ्या पाण्याचा निचरा आणि केबल टाकण्यासाठी रस्त्यांवर चर खोदण्यात येतात. शहरात पाइपलाइन किंवा केबल टाकण्यासाठी रस्ते खोदल्यानंतर चर भरणे आणि रस्ते दुरुस्तीचे काम महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून केले जाते. यासाठी संबंधित संस्थांकडून महापालिका शुल्क आकारते. मात्र, संबंधित प्राधिकरणाकडून अनेक त्रुटी आढळल्याने प्रशासन येत्या काळात धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे.
