म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पत्नी उच्चशिक्षित असली, तरी तिला आधाराची गरज आहे,’ असा निष्कर्ष नोंदवून तिला दरमहा १० हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने पतीला दिला. ‘पत्नी व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवीधारक (एमबीए) आहे. मग तिने स्वतः कमवावे, माझ्याकडे पोटगी का मागते’ हा पतीचा युक्तिवादही न्यायालयाने खोडून काढला.
या प्रकरणात पती सनदी लेखापाल असून, पत्नी गृहिणी आहे. मतभेदांतून होणाऱ्या भांडणांना वैतागून पतीने क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर, पत्नीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम २४ अंतर्गत अंतरिम पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला. तिच्या वतीने अॅड. तेजस पवार यांनी बाजू मांडली. पतीने पत्नीला घराबाहेर काढले असून, उच्चशिक्षित असली, तरी तिच्याकडे उदरनिर्वाहाचा कोणताही स्रोत नाही. पती सनदी लेखापाल असून, चांगले उत्पन्न मिळवत आहे. त्याची शेअर बाजारात मोठी गुंतवणूक असून, जमिनीची मालमत्ताही आहे. सासरच्या घरी असलेल्या जीवनमानाप्रमाणे जगण्यासाठी पत्नीला अंतरिम पोटगीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद अॅड. पवार यांनी केला. त्याला पतीच्या वकिलांनी विरोध केला.
पत्नी क्रूर वागत असून, त्यामुळे पती कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. पतीवर आई-वडील आणि आजीच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. पगारातून सुमारे ३४ हजार रुपये गृहकर्जाचे हप्ते भरावे लागतात. पत्नी उच्चशिक्षित असून, ती निष्क्रिय बसून पोटगी मागू शकत नाही. लग्नापूर्वी ती बँकेत काम करीत होती. त्यामुळे तिला कामाचा अनुभव आहे. त्यामुळे ती स्वतः कमावू शकते, असा युक्तिवाद करून तिचा अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळण्याची विनंती पतीच्या वकिलांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा आधार घेऊन पत्नीला अंतरिम पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला.
या प्रकरणात पत्नीच्या वतीने अॅड. तेजस पवार यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांचे दाखले सादर केले. पत्नी नोकरी करीत नसली, तरी तिच्याकडे शैक्षणिक पात्रता असणे हे अंतरिम पोटगी नाकारण्याचे कारण ठरू शकत नाही, असा निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला होता; तर ‘पत्नीला पोटगी देणे हे पतीचे कर्तव्य आहे,’ असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने एका खटल्यात मांडले होते.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा