• Sun. Aug 9th, 2026

    Hinjewadi Murder : प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळवल्याने पूर्वीच्या प्रियकराने तिच्या नव्या प्रियकराला संपवलं. कारमधून पुणे-सोलापूर मार्गे पंढरपूरकडे पळून जात असताना पोलिसांनी त्याला धाडसाने पकडलं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळवल्याने पूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीसह तिच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला. तर प्रेयसी गंभीर जखमी झाली. ही घटना पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे गुरुवारी (६ ऑगस्ट) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, पळून गेलेल्या आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जेरबंद केले.

    विशीतील प्रेमसंबंधांचा थरार

    सागर साहेबराव गायकवाड (वय २२, रा. मारुंजी, मूळ रा. येवला, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २१ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. मारुंजी, हिंजवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश याचे जखमी तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. तरुणी बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती.

    Maharashtra TimesVikhroli Crime : घरात जाल, तर माझ्यावर अतिप्रसंग करताय म्हणून ओरडेन; विक्रोळीत बापलेकाला संपवलं, जावेने धमकावलं, पण शेजाऱ्यांनी ट्रिक वापरुन पकडलं

    पीजी मॅनेजरसोबत प्रेम जुळलं

    शिक्षणादरम्यान संबंधित तरुणी मारुंजी येथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तेथे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या सागर याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. याचा राग आरोपीच्या मनात होता. याच कारणावरून गुरुवारी दुपारी दिनेश हा सागर व तरुणी राहत असलेल्या पीजी इमारतीत आला. त्याने दोघांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. या हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली.

    पोलिसांच्या नाकाबंदीत आरोपी जाळ्यात

    त्यानंतर आरोपी कारमधून पुणे-सोलापूर मार्गे पंढरपूरकडे पळून जात होता. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी संपर्क साधून आरोपीच्या वाहनाची माहिती दिली. उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून आरोपीला जेरबंद केले. चौकशीत त्याने हिंजवडी येथे खून केल्याची कबुली दिली.

    Maharashtra TimesCrime News : ग्लुकोज ड्रिपमधून पतीला विष, प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओने महिला गोत्यात, मृत्यूच्या तीन महिन्यांनी बॉडी बाहेर काढण्याची वेळघटना घडल्यानंतर तत्काळ आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.