सांगली: जिल्ह्यातील विटा शहरात अशोक खरातसारख्या संतापजनक प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं समोर आलं आहे. ‘तू मागच्या जन्मी नागीन होतीस आणि हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे,’ असं म्हणत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तसंच तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आणि होम-हवनाच्या नावाखाली तब्बल साडे चार लाख रुपयांची आर्थिक फसवणूकही करण्यात आली. या प्रकरणी विट्यातील महेश मोहन बाबर (रा. भवानीमाळ, विटा), संकेत संदीप निकम (रा. घोगाव, ता. पलूस, जि. सांगली) आणि सूरज उपाध्ये या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विट्यातल्या पाटीलवस्ती परिसरात गेल्या काही काळापासून ‘कडेश्वर धाम अध्यात्म संस्था’ नावाच्या आश्रमात विविध गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा होती. हा आश्रम विट्यातील महेश मोहन बाबर, मूळचा घोगावचा पण गेल्या काही काळापासून विट्यात वास्तव्यास असलेला संकेत संदीप निकम आणि सूरज उपाध्ये हे तिघे चालवतात. मागील आठवड्यात एका महिलेच्या तक्रारीवरून या तिघांना विटा पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. त्यांची पोलीस कोठडी आज सोमवारपर्यंत होती. त्यातच आता हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आर्थिक फसवणुकीचा गुन्हा समोर आला आहे.
याबाबत माहिती देताना विटा पोलिसांनी सांगितलं की, १ जून २०२४ ते १२ मे २०२६ या काळात पीडित मुलीला पित्ताशयाचा त्रास होता. याचाच गैरफायदा घेत संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडितेला, संकेत निकम हा शंकर बाबा, महाकाल, बाळूमामा आणि चिले महाराज यांचा अवतार आहे, असं भासवलं. तसंच पीडित मुलीच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येतो, असे सांगून तिला पूजा व हवन करण्यास भाग पाडले. अंधश्रद्धेचा कळस गाठत आरोपींनी पीडितेला, तू मागच्या जन्मीची नागिन होतीस आणि संकेत बाबा हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे, असे सांगितले. पीडितेला भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून आरोपी संकेत निकम याने विटा येथील एका खोलीवर अल्पवयीन पीडित मुलीवर जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. तसंच पूजा आणि हवनाच्या नावाखाली संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडित मुलीच्या वडिलांकडून एकूण ४ लाख ५० हजार रुपये बँक खात्यावर आणि ५० हजार रुपये रोख रक्कम घेतली.
दरम्यान, हा सर्व त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने अखेर विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात कलम ६४, ६४(२) (एम), ३१८ (४), ३५१(२), ३(५) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विट्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा