Ahilyanagar Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये घडला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केल्याचा आरोप
काल सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास संबंधित महिला व तिचा मुलगा हे पोलीस ठाण्यासमोर आक्रमक झाले. गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप करत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वातावरण तापलेलं असतानाच अचानक दोघांनी अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने तसेच तेथील होमगार्ड जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता हस्तक्षेप करत दोघांना ताब्यात घेतलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
Sangli Crime: सांगलीतील ३ भोंदूबाबांची पूर्ण क्राइम हिस्ट्रीच निघाली; खरातप्रमाणेच भयंकर प्रकरण, नागाचा उल्लेख करत मुलीला कसं फसवलं?
सुरू असलेल्या गोंधळात विठ्ठल रावसाहेब खर्चन (वय 45, रा. आखेगाव, ता. शेवगाव) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जमिनीवर कोसळले. उपस्थित पोलिसांनी त्यांना तातडीने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे पोलीस ठाण्याबाहेरील वातावरण आणखी तणावपूर्ण बनलं आणि उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले.
महिलेचा धक्कादायक आरोप
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या मुलाची समजूत काढत लेखी तक्रार देण्याचं आवाहन केलं. पीडित महिलेनं पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. शेजाऱ्यांशी शेतीच्या कारणावरून जुना वाद असून त्यातून सातत्यानं त्रास दिला जात असल्याचा दावा तिने केला आहे.
Kalyan Crime : ‘आई…मी आणि पप्पा घरीच आहोत’; घरी आल्यावर माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली, बापाने पोटच्या मुलीला संपवलं, CCTV सर्व रेकॉर्ड
फिर्यादीत नमूद केलं आहे की, ‘1 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. खिडकीला लावलेली नेट पेटलेली दिसल्यानं त्या व त्यांच्या आई बाहेर आल्या असता काही जणांनी घरात घुसून मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचवेळी काही आरोपींनी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोपही महिलेनं केला आहे.
जीवे मारण्याच्या धमक्या
घरातील सुमारे तीन लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करून नेल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेले मोबाईलही आरोपींनी हिसकावून नेल्याचं म्हटलं आहे. याशिवाय जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात किलबिले कुटुंबातील सदस्यांसह एकूण 16 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे करत आहे.
