• Mon. Jun 15th, 2026
    Water Cut : सिडकोचा मोठा निर्णय, येत्या 28 मे पासून 10 टक्के पाणी कपात होणार

    सिडको क्षेत्रातील नोड तसेच गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठे, हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेले एल-निनो आणि आयओडी परिणाम, या पार्श्वभूमीवर 28 मे 2026 पासून सिडको पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी मुंबई : सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण, मजीप्रा यांचे पाताळगंगा धरण यांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असून, तापमानवाढीमुळे जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवनही वाढत आहे. त्याचबरोबर धरणांतील उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळा अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता विचारात घेता, उपलब्ध पाणीसाठा धरण भरेपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियंत्रित आणि काटेकोर वापर करणे आवश्यक झाले आहे. सदर सर्व स्रोतांतील उपलब्ध जलसाठा, प्राप्त होणारा दैनंदिन पाणी पुरवठा आणि स्थानिक पाणीवाटप यांचे सिडको प्रशासनामार्फत नियमित आढावा घेऊन नियोजन करण्यात येत आहे.

    सध्याच्या परिस्थितीचा सर्वांगीण विचार करून आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून सिडको क्षेत्रात गुरुवार, 28 मे 2026 पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेटवणे, मोरबे आणि इतर संबंधित जलस्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांतील उपयुक्त जलसाठ्यात अपेक्षित वाढ होईपर्यंत सदर पाणी कपात लागू राहील. अशाप्रकारचा पाणी कपातीचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी आपल्या क्षेत्राकरिता घेतला आहे.

    पाणीपुरवठा बंद राहण्याचे सुधारित वेळापत्रक

    अ. क्र. सिडको नोड / विभाग दि. 28/05/2026 पासून पाणीपुरवठा बंद राहण्याचा वार

    • १ खारघर – सोमवार
    • २ तळोजा – शुक्रवार
    • ३ कळंबोली व नावडे – बुधवार
    • ४ कामोठे – शुक्रवार
    • ५ नवीन पनवेल (पूर्व) – सोमवार
    • ६ नवीन पनवेल (पश्चिम) – मंगळवार
    • ७ करंजाडे – गुरुवार
    • ८ काळुंद्रे – शुक्रवार
    • ९ उलवे (सेक्टर-२, ३, ५, ६, १९, १९ए, २०, २१, २३, गव्हाण गाव व मोरावे गाव) – मंगळवार
    • १० उलवे (सेक्टर-८, ८ए , ९, १०बी, १६, १६ए, १५, १७, १८, २४, कोपर, शिवाजी नगर, न्हावा, शेवा व बामणडोंगरी ) – शुक्रवार
    • ११ अ) उलवे (सेक्टर-२५ व २५ए ) ब) द्रोणागिरी – रविवार

    वरील वेळापत्रकानुसार संबंधित नोड / विभागामध्ये पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर काही कालावधीसाठी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी वापरताना आवश्यक दक्षता घ्यावी, असं आवहन करण्यात आलं आहे.

    सिडको पाणीपुरवठा कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना यांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. वाहन धुणे, पिण्यायोग्य पाण्याचा अनावश्यक वापर, पाण्याची गळती दुर्लक्षित ठेवणे, साठवण टाक्या ओव्हरफ्लो होणे अशा बाबी टाळाव्यात. परिसरात किंवा इमारतीत पाण्याची गळती आढळल्यास ती तातडीने दुरुस्त करून घ्यावी.

    उपलब्ध जलसंपत्तीचा जबाबदारीने वापर करून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक काळ सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सिडको प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा