Tree Cutting in Raigad: रायगड परिसराती जंगल काही काळात नष्ट होतील अशी भीती नागरिक व्यक्त करत असून वनविभागाचं या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: रायगड जिल्ह्यातील महाड, रायगड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ल्यापासून थेट समर्थ दासबोधांची समाधी असणाऱ्या शिवथरघळपर्यंत ते थेट वरंध घाट व विन्हेरे विभाग ते खाडीपट्टा विभाग ते वहूर दासगाव या पट्ट्यात ही वृक्षतोड होत आहे. जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगर उजाड झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणात लागणारे वणवे, वृक्षतोड हा कळीचा मुद्दा आहे. रायगड किल्ले परिसरात मोठ्या प्रमाणावर कोळसा भट्टयांनी उच्छाद मांडला आहे. मात्र वनविभाग यावर कोणतीच कारवाई करत नसल्याने किल्ले रायगड परिसरातील ऐतिहासिक जंगल हे येत्या काही दिवसांतच नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. महाड तालुक्यातून होणारी खैराच्या वृक्षांची तोड केल्यानंतर ही खैराची लाकडे
वनविभागाचे मात्र दुर्लक्ष
रत्नागिरी जिल्ह्यातील महाड तालुक्याला लागून असणाऱ्या खेड येथील कात फॅक्टरीत दिली जातात. छोट्या पिकअप रिक्षातून व मालवाहू पिकअप व्हॅनमधून रात्री बारानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत याची छुपी वाहतूक केली जात असल्याची चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथील जिजामाता समाधी स्थळाजवळ वृक्षतोड करू नये, या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले आज्ञापत्र लावण्यात आले आहे. मात्र या आज्ञापत्राची अवहेलना होत आहे.
गंभीर दखल घ्यावी
जावळीची घनदाट वनसंपदा पाहूनच छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ल्यावर राजधानी वसवली होती. त्या राजधानीच्या परिसरात वृक्षांची अपरिमित हानी होणे हा दैवदुर्विलास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रातून झाडांसाठी विशेष संदेश दिला होता. जी झाडे आवश्यक असतील ती हुजुरांच्या परवानगीनेच तोडावी अशा स्वरूपाचे महाराजांचे आदर्श वृक्षधोरण होते. या सगळ्या अवैध वृक्षतोडीची गंभीर दखल वनविभागाने तातडीने घेतली पाहिजे, अशी मागणी दुर्गअभ्यासक, इतिहासप्रेमी प्रवीण कदम यांनी केली आहे.
काजू बाजार कोल्हापुरात!
दरम्यान, राज्यातील सर्वाधिक काजू उत्पादन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होत असताना देशातील पहिली काजू बाजार समिती, काजू निर्यात केंद्र, अत्याधुनिक नर्सरी, प्रक्रिया प्रकल्प आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या सुविधा मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात उभारण्याचा निर्णय घेतल्याने कोकणातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा