म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर: पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेच्या ताज्या अहवालाने नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शहरातील तब्बल २८३ इमारती धोकादायक, तर सहा इमारती अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, १४४ इमारतींकडे स्ट्रक्चरल ऑडिट अहवालच नसल्याचे उघड झाल्याने हजारो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने या इमारतींना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.
इमारती कोसळून अपघात
उल्हासनगर शहरात दरवर्षी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती कोसळून होणाऱ्या अपघाताच्या घटना पाहता, महापालिकेकडून यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अहवालानुसार, प्रभाग समिती क्रमांक १मध्ये ८४, प्रभाग समिती क्रमांक २मध्ये सर्वाधिक ९९, प्रभाग समिती क्रमांक ३मध्ये ६३, तर प्रभाग समिती क्रमांक ४मध्ये ३७ धोकादायक इमारतींची नोंद करण्यात आली आहे. या इमारतींपैकी सहा इमारती राहण्यास पूर्णपणे अयोग्य घोषित करण्यात आल्या आहेत. तसेच, ३४ इमारती रिकाम्या करून संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय २२७इमारतींना तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता असून, १६ इमारती किरकोळ दुरुस्तीच्या श्रेणीत आहेत.
Bullet Train: पारसिक डोंगराखाली बुलेट ट्रेनचा बोगदा; कटरहेड घणसोली शाफ्टमध्ये दाखल, ‘अंडरग्राऊंड टनल’चा मार्ग कसा असेल ?
शहरातील १४४ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्याची बाब सर्वाधिक चिंताजनक मानली जात आहे. या इमारतींची प्रत्यक्ष स्थिती किती धोकादायक आहे, याचा स्पष्ट अंदाज प्रशासनालाही नसल्याचे बोलले जात आहे. तसेच, अनेक जुन्या आणि जीर्ण इमारतींमध्ये आजही हजारो कुटुंबे वास्तव्यास असल्याने संभाव्य दुर्घटनांची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळण्याची दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेकडून संबंधित इमारतींना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील नालेसफाई, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, धोकादायक इमारतींची तपासणी, रस्ते व साकव दुरुस्ती, पूरनियोजन, साथरोग प्रतिबंध, औषधसाठा, फवारणी मोहिमा आणि आपत्तीग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवारा केंद्रांची तयारी यांचा आढावा घेण्यात आला. तसेच, शोध व बचावकार्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मान्सून काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी महापालिका मुख्यालय आणि सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये २४ तास कार्यरत आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही आयुक्त आव्हाळे यांनी दिले.
Mumbai AC Local: ‘हार्बर एसी’ला उदंड प्रतिसाद; पंधरवड्यात प्रवासी संख्या साडेतीन लाखांनजीक, CSMT ते पनवेल प्रवास गारेगार
मान्सूनपूर्व तयारीला वेग
संभाव्य चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि उद्भवणाऱ्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीला वेग दिला आहे. महापालिका हापालिका आयुक्त आयुक्त मनीषा अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले. आपत्कालीन परिस्थितीत कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी बैठकीत दिला. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा