Vidhan Parishad Election: महायुतीमध्ये जागावाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झाले नसताना पुण्याच्या या प्रतिष्ठेच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेले आकड्यांचे राजकारण आता अधिकच रंगू लागल्याचे चित्र आहे.
पुण्यात विधानपरिषदेसाठी भाजपच्या ‘गणिता’ला राष्ट्रवादीकडून चोख प्रत्युत्तर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची असून, आमच्याकडे सर्वाधिक ३७० सदस्यांचे संख्याबळ असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजपने मांडलेले ‘३३३’ चे गणित चुकीचे असून, केवळ राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी या जागेवर दावा केला जात असल्याचे प्रत्युत्तर ‘राष्ट्रवादी’ने दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अॅड. नीलेश निकम आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ‘राष्ट्रवादी’ ची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेच आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. भाजपने मित्रपक्षांच्या पाठिंब्यासह आपल्याकडे ३३३ मतांचे संख्याबळ असल्याचा दावा करून ही जागा स्वतःकडे घेण्याची मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना ‘राष्ट्रवादी’ ने भाजपपेक्षा अधिक म्हणजेच ३७० सदस्यांचे संख्याबळ असल्याचे स्पष्ट केले.
या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या, पक्षाची ताकद आणि जनाधार पाहता या वेळीही ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याची माहिती सुनील टिंगरे यांनी दिली. भाजपने मांडलेले गणित वास्तवाशी विसंगत असल्याचा आरोप करताना टिंगरे म्हणाले, ‘या जागेवरून अनावश्यक वाद निर्माण करणे योग्य नाही. ‘राष्ट्रवादी’ ने नेहमीच महायुतीमध्ये समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमच्या हक्काच्या जागेबाबत मित्रपक्षांकडूनही त्याच संवेदनशीलतेची अपेक्षा आहे.’
“राष्ट्रवादी’त दहापेक्षा जास्त इच्छुक’
पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये मोठी उत्सुकता असून, पक्षात दहापेक्षा अधिक इच्छुक असल्याचा दावाही टिंगरे यांनी केला. उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय उद्या, मंगळवारी मुंबईत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा