• Tue. Jun 16th, 2026
    NEET पेपरफुटीचा ‘गॉड’फादर कोण? मनीषा हवालदारच्या पतीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून संशयास्पद बाबी उघड

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘नीट-यूजी २०२६’ प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणाला आता ‘गॉड’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमुळे नवे वळण लागले आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद चॅट केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) आढळून आले असून, प्रश्नपत्रिका फुटीचा खरा ‘गॉडफादर’ कोण, याचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे.

    तपासादरम्यान मनीषा हवालदार हिने सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट डिलिट केल्याची कबुली दिली; तसेच भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स जाळून टाकल्याचेही तिने मान्य केल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी म्हटले असून, अन्य काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

    Vidhan Parishad : आमचे 333 चे बळ, लावा ताकद! स्थानिक आघाड्यांची रसद, पुण्याच्या जागेवर भाजपचा फायनल दावा! राष्ट्रवादीवर दबाव वाढला​
    तपासादरम्यान मनीषा हिचे पती संजय हवालदार हिच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या मोबाइल क्रमांकाशी झालेला संवाद तपास यंत्रणांच्या हाती लागला. त्यानंतर ‘सेलेब्राइट प्रीमियम’ या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मोबाइलचे डिजिटल एक्स्ट्रॅक्शन करण्यात आले. डिलिट करण्यात आलेल्या चॅटमधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

    चौकशीदरम्यान मनीषा हवालदार हिने एप्रिल २०२६ मध्ये नीट-यूजीच्या भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न काही विद्यार्थ्यांना आणि सहआरोपींना दिल्याचे मान्य केले. हे प्रश्न व्हॉट्सअ‍ॅप आणि आणि प्रिंटआउटच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आले. शेठ हिरालाल सराफ प्रशालेतील अधिकृत संगणकावरून प्रश्नांचे प्रिंटआउट काढल्याची कबुलीही तिने दिली आहे.

    Maharashtra TimesManisha Hawaldar : पुण्यातील मुख्याध्यापिका ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी जाळ्यात, महिन्यावर आलेली नोकरीला कलाटणी देणारी घटना, त्याआधीच गोत्यात
    लातूरमध्ये बेकायदा क्लासेसवर कारवाई
    लातूर: ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी ‘आरसीसी’चा संस्थापक शिवराज मोटेगावकर याच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनाने बेकायदा क्लासेसवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या ‘कोचिंग क्लासेस एरिया’ येथील बेकायदा कोचिंग क्लासेसच्या पायाभूत सुविधांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली.

    प्रश्नांच्या बदल्यात रोखीने व्यवहार
    मनीषा हवालदार हिने सुरुवातीला प्रश्नांच्या बदल्यात एका तरुणाकडून २० हजार रुपये आणि एका महिलेकडून २५ हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याचे सीबीआयच्या चौकशीत सांगितले. ही रक्कम मनीषा मांढरे हिच्या उपस्थितीत मिळाल्याचे तिने नमूद केले. मात्र, नंतर तिने पैसे घेतले नाहीत, असे सांगितल्याचे सीबीआयने न्यायालयात दिलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये म्हटले आहे. झडतीदरम्यान घरातून एक लाख १९३० रुपये रोख सापडले, असेही त्यात नमूद आहे.

    सीबीआयने केली हस्तलिखिते जप्त

    पुणे : ‘नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेली पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार हिच्या घरातील झडतीत केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) भौतिकशास्त्राचे २३ पानांचे हस्तलिखित प्रश्न, ‘नीट’ च्या विविध मूळ प्रश्नपत्रिका, ‘एनटीए’ची अधिकृत प्रमाणपत्रे आणि रोख रक्कम आढळली आहे. हवालदार हिने स्वतः प्रश्न हस्तलिखित स्वरूपात तयार करून, व्हॉट्सअ‍ॅप आणि प्रिंटआउटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याची कबुली दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed