शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मोठं विधान करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सावधतेचा इशारा दिलाय. बारामतीत आलेल्या रोहित पवारांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना भविष्यात मोठ्या राजकीय फाटाफुटीची शक्यता वर्तवली. २०२९ पूर्वी बरंच काही घडू शकतं. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलंय.