सध्या मुंबईत वाहनांची एकूण संख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे चालकांना वाहन उभे करण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे महापालिकेनेही पार्किंगवर लक्ष देताना बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळांबरोबरच रस्त्यांवरील पार्किंगच्या सुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत महापालिकेचे सध्या ३७ सार्वजनिक वाहनतळ असून, ६७ ‘ऑन स्ट्रीट’ वाहनतळ आहेत.
Bribe Case: जीएसटीचे लाचखोर अधिकारी CBIच्या जाळ्यात; व्यावसायिकाकडे मागितली दीड कोटीची लाच, रायगडमधील मोठी कारवाईही स्थगिती दोन वर्षांनी उठवण्यात आली. त्यानंतर २०२२पासून महापालिकेत प्रशासकीय काळ असल्याने तीन वर्षांत वाहनतळ शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर अखेर मुंबई महापालिकेने दहा टक्के वाहनतळ शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव येत्या आठ ते दहा दिवसांत तयार करून मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. आयुक्तांकडून मंजुरी मिळताच स्थायी समिती आणि मुंबई महापालिका सभागृहाकडूनही मंजुरी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
४६.४० टक्के दरवाढीचा प्रस्ताव बासनात
गेल्या तीन ते चार वर्षांत मुंबई महापालिकेचे वाहनतळ शुल्क वाढले नसल्याने एकूण ४६.४० टक्के शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार करून तो महापालिका आयुक्तांकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर केला होता.
मात्र वाहनतळाचे शुल्क भरमसाट नको, असे स्पष्ट करत महापालिका आयुक्तांनी पुढील दोन वर्षांसाठी अ, ब आणि क वर्गातील वाहनतळ शुल्कासाठी दहा टक्के दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत. त्यानुसार नवीन प्रस्ताव तयार करण्यात येत असून, लवकरच महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.
Shiv Sena vs BJP : शिवसेनेकडील खात्यांमध्ये CMO ची ढवळाढवळ, मंत्र्यांची शिंदेंकडे जाहीर नाराजी, रिक्षाचालकांच्या मराठीला मुदतवाढ मिळताच कडेलोटसध्याचे वाहनतळ शुल्क
‘क’ वर्ग
तीन व चारचाकी वाहनांसाठी
एक तास- २५ रुपये
तीन ते सहा तास-४० रुपये
सहा ते बारा तासांसाठी-६० रुपये
दुचाकींसाठी
एक तास- १० रुपये
तीन ते सहा तास-२५ रुपये
सहा ते बारा तास- ३० रुपये
‘ब’ वर्ग
तीन व चारचाकी वाहनांसाठी
एक तास-२० रुपये
तीन ते सहा तास- ३५ रुपये
सहा ते बारा तास- ६० रुपये
दुचाकींसाठी
एक तास -५ रुपये
तीन ते सहा तास- २० रुपये
सहा ते बारा तास -२५ रुपये
‘अ’ वर्ग
तीन व चारचाकी वाहनांसाठी
एक तास – २० रुपये
तीन ते सहा तास – ३५ रुपये
सहा ते बारा तास – ६० रुपये
MPSC Paper Leak : संशय नको, 10 प्रश्न मुद्दाम चुकीचे लिही, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलला दिलेला सल्ला; लग्नासाठी जमवलेल्या 12 लाखांची 77 प्रश्नांसाठी डीलवर्गवारी कशी ?
महापालिकेचे वाहनतळ हे वर्गीकृत असून, जिथे मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीय नागरिक वाहने पार्क करतात अशा वाहनतळांचा ‘क’ वर्गवारीत समावेश आहे. तर ‘ब’ वर्गवारीत सर्वसाधारण व्यापारी क्षेत्र, कार्यालयीन संकुलांचा, तर ‘अ’ वर्गवारीत अत्यंत महत्त्वाची व्यापारी संकुले, वर्दळीची सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये यांचा समावेश होतो. या सर्व ठिकाणी दहा टक्के शुल्कवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे.
