Raigad CBI Action: रायगड जीएसटी कार्यालयातील ४० लाख रुपयांच्या लाचप्रकरणी सीबीआयने ३ अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची रायगड जिल्ह्यात दगड खाण आहे. खाणीसाठी मिळणारी रॉयल्टी आणि व्यावसायिकाला लावण्यात आलेला जीएसटी माफ करण्यासाठी त्यांनी अधीक्षक राकेशकुमार सिन्हा यांची भेट घेतली.
MPSC Paper Leak : संशय नको, 10 प्रश्न मुद्दाम चुकीचे लिही, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलला दिलेला सल्ला; लग्नासाठी जमवलेल्या 12 लाखांची 77 प्रश्नांसाठी डीलत्यांनी अतिरिक्त आयुक्त विनयकुमार कंथेटी यांच्यासह सर्वांसाठी दीड कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. इतकी रक्कम नसल्याने व्यावसायिकाने तडजोड केली. तडजोडीनंतर ४० लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र लाच द्यायची नसल्याने व्यावसायिकाने सीबीआयकडे तक्रार केली. या तक्रारीची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, त्यामध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले.
सीबीआयने तक्रारीत तथ्य असल्याने या प्रकरणी गुरुवारी सापळा रचला. कंथेटी आणि सिन्हा यांच्या वतीने ४० लाख रुपये घेताना एजंट नरिंदर राजपूत याला पकडण्यात आले. पैसे घेतल्यानंतर त्याने याबाबत सिन्हा यांना कळविले. त्यामुळे सीबीआयने राजपूत याच्यासह कंथेटी आणि सिन्हा यांना अटक केली. अटकेनंतर तिघांची कार्यालये, निवासस्थानी छापा टाकण्यात आला. त्यात ४३ लाखांची रोकड आणि सुमारे ९० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले, अशी माहिती सीबीआयच्या प्रवक्त्याने दिली.
Nepal Flood : मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? नेपाळमध्ये बेपत्ता जीवलगांच्या कुटुंबांची घालमेल, मुंबई-पुण्यातील ग्रुप संपर्काबाहेरतसेच दुसऱ्या एका घटनेत, पंचनाम्यात १०० ब्रास माती ५० ब्रास असल्याचे दाखवून रॉयल्टी आणि दंड कमी करण्यासाठी, तसेच बेकायदा वीटभट्टी सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुरबाड येथील ग्राम महसूल अधिकारी मिलिंद शिंदे आणि पोलिस पाटील कुंडलिक दमाने यांना अटक केली. या प्रकरणात मध्यस्थी करणे आणि लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोपही आहे. दोघांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.
