उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे शनिवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे. या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विधान परिषदेच्या जागावाटपांबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले नाहीत, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याची चर्चा आहे. याबाबत सुरु असलेल्या विविध चर्चांवर अखेर मंत्री संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी विविध घटनांवर सविस्तर भूमिका मांडली. “आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ नेते बोलणी करत आहेत. 17 पैकी किती जागा मागितल्या, किती मागायच्या यावर अजून कोणाकडेही स्पष्टता नाही. आम्ही सात जागा मागितल्या, राष्ट्रवादीने किती मागितल्या, भाजपाने किती मागितल्या या सगळ्या चर्चा आहेत. या चर्चेचा शेवट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यातील बैठक झाल्यानंतर होणार आहे. एकनाथ शिंदे या चर्चेसाठी दिल्लीला गेले अशा काही बातम्या चालत आहेत, त्यात काही तथ्य नाही. एकनाथ शिंदे विभागाच्या काही महत्त्वाच्या कामांसाठी दिल्लीला गेले आहेत. गेल्या आठवड्यातही गेले होते आणि आताही गेले आहेत. विधान परिषदेची चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणं मला वाटतं हे मनाला पटणारं नाही”, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी स्पष्ट केली.
तुमच्या जागेवर भाजप आग्रही आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी शिरसाटांना विचारला असता |चर्चेमध्ये हे सगळं चालत असतं. कोण कोणती जागा घेणार, कुणी कुणाचं संख्याबळ दाखवावं या सगळ्या गोष्टी चर्चेमध्ये चालतात. सगळ्या जागा आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. वरिष्ठ नेते यावर तोडगा काढतील”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुंबईच्या वांद्रे पूर्व येथे अतिक्रमण विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत लोकांना बेघर करण्यात आलं, अशी टीका काही नेत्यांकडून करण्यात आली. यावर संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली. “प्रत्येक जण उठतो, खास करून मुंबईत रेल्वे स्टेशनच्या बाजूला एखाद्या गुंडाला पगडी देऊन एखादा घर घेतो, तो स्वतःच्या मालकीचं आहे असं समजतो. त्यामुळे मुंबईला अतिक्रमणाचा विळखा पडत चालला आहे. मग त्याच्यातून ड्रग्ज माफीया, लुटमार, लुटारू आणि गँगवॉर अशा सगळ्या टोळ्या निर्माण होतात. जे काही पकडले गेले ते अशा स्लम भागातून पकडले गेले आहेत आणि अशा लोकांना पाठिंबा देणे मला वाटते गैर आहे. जो स्थानिक मुंबईकर आहे, तो 30 ते 40 वर्षांपासून राहतोय. त्याचे घर पाडले गेले असेल तर त्याला आपण योग्य तो सपोर्ट केला पाहिजे. त्याची कुठे शिफ्टिंग करता येईल का याची काळजी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे. परंतु रोज येणारे लोंढे आणि त्याच्यामुळे होणारा अतिक्रमण मुंबईसारख्या शहराला परवडणारे नाही”, असं परखड मत त्यांनी मांडलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन संजय शिरसाय यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. “रोहित पवार आजकाल प्रत्येक पक्षाचे भविष्य सांगत फिरत आहेत. स्वतःचा पक्ष कुठे चाललाय याची त्यांना गॅरंटी नाही. काल त्यांचं स्टेटमेंट पाहिले तर त्यांनी स्वतः सांगितलं जर शरद पवारांनी भाजपासोबत युती केली तर मला पक्ष सोडावा लागेल. याचा अर्थ काय होतो,तुमच्याच पक्षात अलबेला नाही ना? म्हणून पहिले स्वतःचा पक्ष सांभाळा. पक्षात होणारी फूट थांबवा. नंतर इतर पक्षाबद्दल विचार करा. शिवसेनेचा एकही आमदार इकडे तिकडे जाणार नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे आहोत”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी निधी वाटपाबाबत काही तक्रार केली ते मी ऐकले नाही आणि कुणाला किती निधी दिला याचा रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसमध्ये असतो. निधी हा काही गुपचूप अंधारात दिला जात नाही, म्हणून अशा काही तक्रारी असतील तर त्यांनी माझ्याकडे यावं. माझ्यासोबत सोबत चर्चा करावी. मी त्यांना स्पष्टीकरण देऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा