मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपुरात रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट दिली. मनोज जरांगे यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी भूमिका मांडत असताना चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी दाखल झाले. रोहित पवार यांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी रोहित पवार यांना मोलाचा सल्ला दिला. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असेल, चर्चेचं निमंत्रण मिळत असेल तर उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवारांना केलं. यावेळी रोहित पवारांनी चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली.
“राज्यातील बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरु आहे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळण्यासाठी सर्व राज्यातील शेतकरी एकवटला आहे. शेतकरी वाचला तर आपण सर्व वाचणार आहोत. शेतकरी वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचा कसा? आंदोलनाला चांगला प्रतिसाद आहे”, असं मत मनोज जरांगेंनी मांडलं.
जरांगेंची रोहित पवारांना आपल्या पार्टीत येण्याची ऑफर
“फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही कितीही पोटतिडकीने केलं तरी लोकं त्याला राजकारणच म्हणणार आहेत. तुम्ही आमच्या पार्टीत या. आमच्या पार्टीत लयी मथळा आहे. तुम्ही कुठेही बसा, उठवणार नाहीत. तुम्ही काहीही मागा, टेन्शन नाही. तुमच्या पार्टीत हे प्रश्न सोडवणं अवघड आहे. आमच्या पार्टीत आलं तर अशी गर्दी येईल, धडाधडा सगळं सुरु असतं. तुमच्या पोटतिडकीला किती महत्त्व दिलं जाईल ते माहिती नाही. कितीही अराजकीय म्हटलं तरी मान्य किती जणांनी करायचं? इथपर्यंत विषय आहे. पण आपण शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांकडे शेतकऱ्यांच्या लढाईसाठी लढत आहेत या अँगलने बघावं. ते राजकारणासाठी आलेले नाहीत. आपण देखील शेतकरी म्हणून त्यांना पाठिंबा द्यावा”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
‘मला पवारांचा माणूस म्हणतील’
“आता माझी अशी पंचाईत होणार आहे की, मी इथून गेलो तर म्हणतील की, हा पवारांचा माणूस आहे. परवा रात्रभर मी देवेंद्र फडणवीस यांचा माणूस होता. आता तिथून सुटेल आणि तुमच्या गळ्यात पडेल. माझी खूप फरफट होते. मी ज्याला भेटायला जातो त्याचाच माणूस आहे, असं म्हणतात. पण माझी प्रामाणिक भूमिका असते. जिथे समाजावर अन्याय होईल तिथे आम्ही धावून जात असतो. त्याबाबत आम्ही कधीच काटकसर करत नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आंदोलनाला बसले होते. तिथेही आम्ही गेलो होतो. कुणी कुठल्याही पक्षाचा असो, शेतकऱ्यांसाठी कुणी मैदानात असेल तर आम्ही सर्व कायम सोबतीला आहोत. उद्या भाजपची लोकंही उपोषणाला बसावं, मी सर्वात आधी येईन. फक्त नावं ठेवू नये. ते त्यांच्या भूमिकेवर आहेत, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. भूमिका शेतकऱ्यांची आहे. त्यासाठी आपण पाठिंबा दिला पाहिजे”, असंही ते म्हणाले.
‘तुमच्यावर उपोषणाची वेळ कशी येते?’, मोदींचा उल्लेख करत सवाल
“रोहित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा जीआर दाखवला. त्यामध्ये शब्दांचा खेळ कसा असतो ते त्यांनी दाखवलं. भाऊ तीन वर्षे झाले, मी तेच अनुभवत आहे. तुम्हाला उपोषण बसायची वेळच यायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना तांब्या भरुन पाणी देतात. मोदी एवढा जीव लावतात तर तुम्ही उपोषण करुन कशाला हाडकं मोडून घेत आहात? पवार साहेबांना सांगा की, एक फोन तिकडे फिरवा म्हणून… त्यांचं चांगलं आहे. तुमच्यावर तरी कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
मनोज जरांगेंचा रोहित पवारांना चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला
“माझं दुसरं प्रामाणिक मत आहे की, सरकार तुम्हाला बोलवत असेल तर चर्चा करुन मार्ग काढायचा प्रयत्न करावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. नाही ऐकल्यावर बघू. एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवा. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर एकदा विश्वास ठेवा. एकदा विश्वास ठेवा”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी रोहित पवारांना केलं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा