Pune Crime NEET Paper Leak : तपासाचा धागा आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी हवालदार यांनी चक्क भौतिकशास्त्राच्या नोट्स जाळून नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.
मनीषा हवालदार चॅटिंग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, पुणे : नीट-यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात अटक करण्यात आलेली पुण्यातील शिक्षिता मनीषा हवालदार हिच्या घरातील झडतीत केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) भौतिकशास्त्राच्या प्रश्नांचे 23 पानांचे हस्तलिखित, नीटच्या विविध मूळ प्रश्नपत्रिका, एनटीएची अधिकृत प्रमाणपत्रे आणि रोख रक्कम आढळली आहे. एवढेच नव्हे, तर हवालदार यांनी स्वत: प्रश्न हस्तलिखित स्वरुपात तयार करुन, व्हॉट्सअॅप आणि प्रिंटआउटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याची कबुली दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
23 पानांच्या हस्तलिखित नोट्स सापडल्या
सीबीआयने सदाशिव पेठेतील हवालदार हिच्या राहत्या घराची झडती घेतली असता, भौतिकशास्त्र विषयाच्या 23 पानांच्या हस्तलिखित नोट्स सापडल्या. याशिवाय नीट-यूजीच्या विविध मूळ प्रश्नपत्रिकाही जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये मराठी-इंग्रजी मास्टर सेट एम-2 कोडची प्रश्नपत्रिका; तसेच हिंदी-इंग्रजी स्वरुपातील प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. तपास पथकाने एनटीएकडून देण्यात आलेली उपस्थिती प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रांच्या प्रतीही ताब्या घेतल्या आहेत. Nanded News : पोलिसांच्या रुपात देव भेटला! बेपत्ता लेकराला पाहताच कुटुंब ढसाढसा रडलं, मेडिकलचा विद्यार्थी ‘अभय’ दीड महिन्यांपासून गायब; भिकारी म्हणून दिवस काढले
प्रश्नांच्या प्रतिमा प्रिंट करुन देण्यात आल्याची कबुली
तपासादरम्यान मनीषा हवालदाराने एप्रिल 2026मध्ये नीट-यूजीच्या भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न स्मरणशक्तीच्या आधारे भाषांतरित करुन, तेजस शाह या विद्यार्थ्याला दिल्याचे मान्य केले. हे प्रश्न एनटीएच्या रसायनशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुजाता काळे यांच्या सांगण्यावरुन दिल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर सहआरोपी मनीषा मांढरेच्या विनंतीवरुन हेच प्रश्न व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. यासाठी स्वत:चा आणि पतीचा मोबाईल वापरल्याची माहिती हवालदाराने सीबीआयला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शेठ हिरालाल सराफ प्रशालेतील अधिकृत संगणकावरुन प्रश्नांच्या प्रतिमा प्रिंट करुन देण्यात आल्याची कबुली हवालदार हिने दिली आहे. याशिवाय मनीषा मांढरेसोबतचे व्हॉट्सअॅप चॅट डिलिट केल्याचे आणि भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स जाळून टाकल्याचेही तिने मान्य केले आहे, असं सीबीआयने रिमांड रिपोर्टमध्ये म्हटले आहे. Dhule Crime: लग्न लावून देत नाही म्हणून रागात मुलाने आईला पेटवलं; गंभीर भाजल्याने माऊलीचा तडफडून मृत्यू, धुळे हादरलं
मोबाईलचे विश्लेषण
झडतीदरम्यान, मनीषा हवालदाराच्या घरातील कपाटातून एक लाख एक हजार 930 रुपये रोख सापडले. त्यापैकी 60 हजार रुपये सीबीआयने जप्त केले. तपास पथकाला हवालदाराच्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद व्हॉट्सअॅप चॅटही आढळले. त्यानंतर हा मोबाईल फॉरेन्सिक विश्लेषण करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. सीबीआयच्या तपासामुळे नीट-यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटीचे जाळे अधिक व्यापक असल्याचे स्पष्ट होत असून, या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा