• Sun. Jun 7th, 2026
    मॉडर्न मुलगी अचानक पंजाबी ड्रेसमध्ये, विशिष्ट महिन्यात उपवास, कुटुंबाला संशय, ‘द नाशिक स्टोरी’चा कॉलेजपासूनचा प्रवास उघड

    Nashik TCS Case : जुलै २०२२ मध्ये ‘मॉडर्न’ असणारी मुलगी अचानक ‘जीन्स-टॉप’ऐवजी पंजाबी ड्रेस परिधान करू लागली, तसेच तिने सलग दोन वर्षे एका विशिष्ट महिन्यात ‘उपवास’ ठेवल्याने १५ मार्च रोजी कुटुंबीयांचा संशय बळावला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सौरभ बेंडाळे, नाशिक : काचेच्या भिंती, लॅपटॉप आणि प्रगत करिअरचे स्वप्ने पाहणाऱ्या अविवाहित तरुणीवर अत्याचार करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांच्या टोळीने पीडितेला महाविद्यालयात हेरून ‘केरला स्टोरी’ चित्रपटाप्रमाणे ‘ द नाशिक स्टोरी ‘ची सुरुवात केल्याची धक्कादायक माहिती आहे. संशयिताने महाविद्यालयाबाहेर ‘रोमिओगिरी’ करून पीडितेवर प्रेमाचे जाळे टाकले. त्यानंतर तिला स्वतः काम करीत असलेल्या कार्यालयात नोकरी मिळेपर्यंत पाठलाग केला. बिंग फुटणार हे लक्षात येताच तिन्ही संशयितांनी सावध होऊन काही ‘मेसेज डिलिट’ केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

    बहुराष्ट्रीय कंपनीतील २४ वर्षीय अविवाहित तरुणीवर अत्याचारासह धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत देवळाली कॅम्प पोलिसांत २६ मार्च २०२६ रोजी दाखल गुन्ह्यातील दोषारोप पत्र ‘एसआयटी’ ने नाशिक न्यायालयात दाखल केले आहे. त्यामध्ये तपासातील अनेक धक्कादायक बाबींचा समावेश असून, संशयित दानिश शेख (वय ३२), तौसिफ अत्तार (३६) आणि निदा खान (२८) यांच्याविरूद्ध सबळ पुराव्यांचा समावेश आहे.
    Maharashtra TimesTwisha Sharma Death : ट्विशाने अखेरचा श्वास घेतला, त्या रुफटॉपचा फोटो समोर, कटारा हिल्समधल्या बहुमजली घरात दडलंय मृत्यूचं गुपित

    कॉलेजमध्ये शिकतानाच प्रेमाचं जाळं

    त्यापैकी दानिशने पीडितेवर अत्याचार केला असून, त्याने कंपनीच्या कार्यालयात नव्हे; तर पीडिता महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकल्याची माहिती आहे. दानिश हा एका नामांकित महाविद्यालयाबाहेर सातत्याने ‘रोमिओगिरी’ करायचा. पीडिता व संशयित एकाच महाविद्यालयात असल्याने त्याने तिला हेरून तिच्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. ‘डायलर टेक्निकल लीड’ पदावर कार्यरत दानिशने पीडितेला जुलै २०२२ मध्ये नोकरीला लावून घेतले; पण चकचकीत ‘कॉर्पोरेट’ कार्यालयात तिला विवाहाचेच आमिष दाखवून प्रत्यक्षात धर्मांतराचे षडयंत्र शिजत होते.

    संजय शिरसाटांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, शिवसेनेचे पदाधिकारी आमच्याही संपर्कात; चिखलीकरांचा पलटवार

    मॉडर्न मुलगी अचानक पंजाबी ड्रेसमध्ये

    जुलै २०२२ मध्ये ‘मॉडर्न’ असणारी मुलगी अचानक ‘जीन्स-टॉप’ऐवजी पंजाबी ड्रेस परिधान करू लागली. तिने सलग दोन वर्षे एका विशिष्ट महिन्यात ‘उपवास’ ठेवल्याने १५ मार्च रोजी कुटुंबीयांचा संशय बळावला. तिच्या पालकांनी विश्वासात घेतल्यावर पीडिता स्वतः ऐवजी संशयितांच्या धर्माबाबत अधिक बोलत होती. दहा दिवसांच्या समुपदेशनानंतर २६ मार्च रोजी पीडितेसह नातलग पोलिसांत पोहोचले आणि ‘द नाशिक स्टोरी’ च्या तपासाला सुरुवात झाली. या संदर्भात सविस्तर पुरावे दोषारोप पत्रात दाखल आहेत. दानिशने पीडितेकडून वेळोवेळी महागड्या वस्तू उकळल्या असून, त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
    Maharashtra TimesMumbai News : मुंबईतील भिकारी निघाला मेडिकलचा विद्यार्थी, मालाड पोलिसांनी नांदेडचा ठावठिकाणा शोधला, ‘अभय’ला पाहताच कुटुंब गदगदलं

    ‘हानिया को दावत…’

    धार्मिक कट्टरतेसाठी संशयितांचा व्हॉटसअॅपवर एक खास ग्रुप कार्यरत होता. संशयितांनी एकमेकांसोबत केलेल्या ‘चॅटिंग’ मध्ये ‘आज हानिया का नंबर…’, ‘हानिया के साथ हूँ’ या स्वरूपाचे मेसेज आहेत. यासह संशयितांपैकी एकाच्या नातलगाने संशयिताला ‘हानिया को आज दावत दी…’, असा मेसेज केला. या स्वरूपाचे अनेक पुरावे पोलिसांनी संकलित केले आहेत.

    TCS scales up 'Human+AI' strategy amid enterprise AI push: Chairman N Chandrasekaran

    दरम्यान, संशयितांच्या कटानुसार पीडितेचे वर्तन सुरू झाल्यावर ती अत्यानंदित झाल्याच्या हेतूने तिचे नाव ‘हानिया’ ठेवण्यात आले होते. पीडितेचे मूळ नाव हे तिच्या धर्मानुसार महत्त्वाचे होते. त्यामुळेही नामकरणाचा डाव संशयितांनी आखला होता.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा