• Sun. Sep 6th, 2026

Crime News : दरोडेखोरांनी स्वप्नातही विचार केला नसेल तशा मुसक्या आवळल्या, समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्यांना सिनेस्टाईल बेड्या

समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्यांना पोलिसांनी जन्माची अद्दल घडवली आहे. दरोडेखोरांनी स्वप्नातही विचार केला नसेल तशा पद्धतीने पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलीस चक्क ठेकेदार बनून पानटपरीवर पोहोचले. तिथे त्यांनी आरोपीच्या नांग्या ठेचल्या.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक 18 हडसपिंपळगाव जवळ चालकाला मारहाण करून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीवर पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आखलेल्या अत्यंत कल्पक सापळ्यात अडकून 4 नवीन फरार आरोपी गजाआड झाले आहेत. यामध्ये वेशांतर करून गेलेल्या पोलिसांसाठी पानटपरी चालकाचा एक फोन तपासातील मुख्य दुवा ठरला. या कारवाईमुळे या दरोड्याच्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या आता 11 वर पोहोचली आहे.

आरोपी ओमकार रामचंद्र फसले (वय 22) याला बीड जिल्ह्यातील म्हाळस जवळा येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी त्याच्या गावात सापळा रचून त्याला पान टपरी येथून अटक केली. अहिल्यानगरच्या कायगाव टोका येथून तीन जणांना अटक केली. भिमराव उर्फ शहादेव भगवान तांदळे (वय २६), सुनील गणपत चव्हाण (वय २२), सुनील कल्याण शेंडगे (वय २६) या तिघांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. तसेच या आरोपींच्या टोळीला वाहन पुरवणारा हा सराईत गुटखा तस्कर आहे.

पोलिसांनी आरोपी ओमकारला सापळा पकडत मुसक्या आवळल्या

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल समृद्धी दरोड्याच्या गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील म्हाळस जवळा येथील ओमकार फसले हा चालक आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गावात थेट तपास केल्यास आरोपी पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ‘ठेकेदाराचा वेश’ धारण केला.

Maharashtra TimesDelhi Building Collapse : दिल्लीत हाहाकार, पाच मजली इमारत कोसळली, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीसोलापूर-धुळे हायवेवर उड्डाणपुलाच्या कामासाठी चांगल्या पगाराचा टिपर चालक हवा असल्याचा बनाव करत पोलिसांनी गावातील एका पानटपरीवर संवाद साधला. पानटपरी चालकाने आरोपी ओमकारला फोन करून ठेकेदार आल्याची माहिती दिली. चांगल्या नोकरीची संधी मिळताच ओमकार स्वतःहून पानटपरीवर आला. त्याने स्वतःचे ओळखपत्र दाखवून खात्री पटवताच, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

Maharashtra TimesMaharashtra Rain : श्रींच्या आगमनाला तुफान पाऊस येणार, 13 ते 17 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

नाकाबंदी अन् धाडसी कारवाईत अन्य ३ आरोपी जेरबंद

दुसऱ्या एका पथकाने कायगाव टोका परिसरात सापळा रचून भिमराव उर्फ शहादेव तांदळे आणि सुनील चव्हाण या दोघांना बेड्या ठोकल्या. तर तिसऱ्या कारवाईत, दरोड्यासाठी स्वतःचे वाहन पुरवणारा सुनील शेंडगे याला तिसगाव परिसरातून पकडण्यात आले. आरोपी सुनील शेंडगे हा सराईत गुटखा तस्कर असून, वाळूज येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावर गाडी घालून गुटख्याचा टेम्पो पळवल्याप्रकरणी गेल्या ३ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

Maharashtra TimesMeghna Bordikar : डीजेमुळे माझ्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू, मंत्री मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य

एकूण ११ दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

यापूर्वी परशुराम गायकवाड, किरण गायकवाड, करण जाधव, अनिल जाधव, पंडित लष्करे, ज्ञानेश्वर जाधव आणि उमेश गायकवाड या ७ जणांना अटक करण्यात आली होती. नव्या ४ आरोपींसह या प्रकरणातील एकूण ११ आरोपींना आता पोलिसांनी गजाआड केले आहे. ही धडक कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा विशेष पथकाने पार पाडली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा