• Sat. Sep 5th, 2026
Maharashtra Live News 23rd May 2026 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Weather Update : ढगाळ वातावरण… असह्य उकाडा; मुंबईत सकाळी रिमझिम पावसाची हजेरी; पण मान्सूनपूर्व सरींची अजून प्रतीक्षाच

वाढलेली आर्द्रता, ढगाळ आकाश, अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून यामुळे मुंबईकर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असले तरी मान्सूनपूर्व सरींचे आगमन झालेले नाही. त्यामुळेच वातावरणातील उष्णता आणि आर्द्रता यामुळे असह्य उकाड्याला मुंबईकर तोंड देत आहेत. रात्रीच्या वेळीही तापमानाचा पारा फारसा खाली जात नाही. परंतु, शुक्रावारी उपनगरात हलका पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. शनिवारी सकाळीही शहरातील काही भागांत रिमझिम पावासाची जाणीव झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed