Amravati Crime: दर्यापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर २ अज्ञातांनी घरात घुसून चाकूहल्ला केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून वेगळेच सत्य समोर आले आह.
काय घडलं नेमकं?
दर्यापूरच्या आनंदनगर भागात बुधवारी दोन दुचाकीस्वारांनी एका मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची तक्रार दाखल झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी आनंदनगर परिसरातील मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, कथित घटनेच्या वेळेत तिथे कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा मोटारसायकल दिसली नाही. हाच या तपासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला आणि पोलिसांचा संशय बळावला.
El Nino: यंदाच्या खरीपावर ‘एल निनो’चं संकट! राज्यात सरासरी 88 टक्के पावसाचा अंदाज, प्रभाव कधीपासून दिसणार?
सहायक पोलिस निरीक्षक नम्रता राठोड यांनी मुलीला आणि तिच्या आईला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीसमोर अखेर मुलीचा धीर सुटला आणि तिने सत्य कबूल केले. आदल्या रात्री आई रागावल्यामुळे ती प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात भाजी कापत असताना, वैतागाच्या भरात तिने स्वतःच्याच हातावर आणि गळ्यावर चाकू चालवला. रक्त पाहून घाबरलेल्या मुलीने घरच्यांच्या रागापासून वाचण्यासाठी चेहरा झाकलेल्या दोन मुलांनी हल्ला केला अशी काल्पनिक कथा रचली.
Maratha Reservation : एकीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा इशारा, दुसरीकडे CM फडणवीसांचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला; केलं मोठं आवाहन…
तर दुसऱ्या एका घटनेत, अमरावती-अकोला महामार्गावर लोणी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात ताजनगर येथील मोहम्मद नौशाद कुरेशी (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गुलनाज अंजुम मोहम्मद नौशाद कुरेशी (३५) आणि आठ वर्षीय मुलगा मोहम्मद अबदान हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
