• Sun. Jun 7th, 2026

    मुंबई ते गोवा प्रवास 8 तासांत; पुणे-सोलापूर, बंगळुरूसह अनेक महामार्गांना जोडणार, 13 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग

    मुंबई ते गोवा प्रवास 8 तासांत; पुणे-सोलापूर, बंगळुरूसह अनेक महामार्गांना जोडणार, 13 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग

    Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. 13 जिल्ह्यांमधून जाणारा हा मार्ग पुणे-बंगळुरू, मुंबई-बंगळुरू, पुणे-सोलापूर महामार्गांसह अनेक महामार्गांना जोडणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यानुसार महामार्गाची लांबी 54 किलोमीटरने वाढवण्यात आली असून प्रकल्पाचा खर्च आता 1 लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या महामार्गामध्ये सातारा जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला. त्यानंतर ही संख्या 13 झाली. साताऱ्याचा समावेश केल्यामुळे महामार्गाची प्रमुख शहरं आणि महामार्गांशी कनेक्टीव्हीटी वाढणार आहे.

    कसा असेल मार्ग?

    नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला फेब्रुवारी 2024मध्ये मंजुरी मिळाली होती. पण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ऑक्टोबर 2024मध्ये हा आराखडा रद्द करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये महायुती सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पर्यायी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही भागांना वगळून नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आला. यामध्ये 13 जिल्हे आणि 40 तालुक्यांचा समावेश आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे. महाराष्ट्रातील माहुर, तुळजापूरसारख्या महत्त्वाच्या 21 शक्तीपीठांना हा मार्ग जोडणार आहे.

    Maharashtra TimesPune Metro: ‘फेज 2’अंतर्गत पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार; 22 किमी लांब डबल-डेकर उड्डाणपुलांचा समावेश, कुठे-कसे असतील मार्ग?

    कोणत्या महामार्गांना जोडणार?

    साताऱ्याचा समावेश केल्यामुळे हा मार्ग मुंबई-बंगळुरू महामार्गाला (NH48)ला जोडणार आहे. जिल्ह्यातील कराड शहरापासून हे केवळ 36 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे साताऱ्यामधील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. त्याशिवाय, हे ठिकाण दक्षिण मुंबईपासून केवळ 6 तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी शक्तीपीठ महामार्ग वर पोहोचणं सोपं होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग बांदा येथे समाप्त होतो. मुंबई-बंगळुरू महामार्गाला जोडणाऱ्या जागेपासून महामार्गेचे शेवटचे टोक केवळ 173 किलोमीटर अंतरावर असेल. हे अंतर पार करण्यासाठी 2 तासांपेक्षाही कमी वेळ लागण्याची शक्यता आहे.

    दक्षिण मुंबई ते गोवा प्रवास

    सध्या दक्षिण मुंबईहून गोव्यापर्यंत प्रवास करण्यासाठी ट्रेनने 11 तास तर गाडीने 11-12 तास लागतात. हाच वेळ 8 तासांहूनही कमी होणार आहे. याशिवाय, भविष्याच पुणे-बंगळुरू महामार्गाचं काम पूर्ण होताच हा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुणे-सोलापूर महामार्गालाही शक्तीपीठ महामार्ग जोडणार आहे. सोलापूर जिल्ह्यापासून 60 किलोमीटर अंतरावर मोडनिंबजवळ हे दोन्ही मार्गे एकमेकांशी जोडलेले असतील. यामुळे सोलापूर आणि तुळजापूरपर्यंत कनेक्टीव्हीटी वाढणार आहे.

    Kolhapur | शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, सरकारवर गंभीर आरोप

    दरम्यान, परभणी जिल्ह्याजवळ जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, तुलजापूरजवळ सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्ग आणि तासगावजवळ पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्गांना जोडणारे इंटरचेंज तयार केले असतील. जालना-नांदेड मार्गाचं काम सध्या सुरू असून येत्या 30 महिन्यांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा